पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१९ विछिन्न जालें ! निजामअल्ली तूर्त बिघाड करीत नाही. सलूखच आहे. मी सुचित झालों मणजे तपशीलवार तुह्मांस लिहून पाठवून देतो. तुमीं मार्गी सावधपणे जाणे. वरचेवर आह्मांस वर्तमान लिहीत जाणे. आमी येथे येऊन गुंतलों. लढाईचा कारभार. सरकारी कार्य. कसे जावें ? हें कार्य जालियावर परगणेयांत येतो. दरबारचे काम कळेल त्या प्रकारे साधावें. बहुत काय लिहिणे. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. [१३९] ॥श्री॥ १७५९.. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिले पाहिजे. विशेष. तुझी बीदा होऊन गेला. आह्मी श्रीगंगेच्या पायघाटें उतरोन जलालाबादेस गेलो. मध्ये त्याचे ठाणे सबळगडी होते. ते उभाउभी आवईनेच सोडून जलालाबादेस आवघे रोहिले गेले. आवसा पाहून दुंदेखान वगैरे चौघेजण याचे कुमकेस होते. आह्मी गेलियाउपरि मामलत विल्हे लावा ऐसा पैगाम आफीजरहिमत याजकडून आला. तों अगोदरच रोहिल्याचे व सुजातदौल्याचे सूत्र जालेच होते. तो दरकूच लखनऊहून रामगंगेस पूल बांधोन पुढे उमराव वगैरे दाहा बारा हजार प्यादी, कांहीं निम्मे स्वार, ऐसा जलालाबादेस आले. अटकेपलीकडून अबदाली चाळीस हजार फौजेनिसी लाहोरास येऊन खासा राहून पुढे जाहानखान वगैरे सरदार पंधरा हजार स्वारांनिसी सरदेवर आले. राजश्री साबाजी पाटील अलीकडे आले. एवंच दंगा व्हावयासी जाले आहे. आपल्या फौजा राजश्री मल्हारबा पंधरा दिवसांत येतील. त्यांचे यांचे एक झुंज जाल्यावर सर्व उत्तमच आहे. नाही तर कठीण काम ! दंगा व्हावयासी उशीर नाही. त्यास तुह्मीं तूर्त जावयाची उतावळी सर्वथा न करणे. पंधरा दिवसांत सर्व ठीक