पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ साद्यंत तुह्मांस व चिरंजीव बाबूराऊ यास लिहून पाठवितों. यासमयीं आह्मी येथे गुंतलो आहों. सर्व भरंसा आह्मांस तुमचा आहे. वरचेवर वर्तमान लिहीत जाणे. श्रीरंगपट्टण गार्दियांनी घेतले. मोठे संस्थान १९३ कवाईत शिकलेल्या लोकांचा सरदार हैदरअल्ली याला अनुलक्षून हे वाक्य आहे. ह्यावेळी झैसूरचा चिक्क कृष्णराज ह्मणून कोणी राजा होता. नंदीराज हा त्याचा मुख्य दिवाण होता. राजा दुर्बल व मंत्री दुर्बुद्धि असल्यामुळे हैदर नाइकाच्या तडाक्यांत हे संस्थान सांपडले. रोमन पातशाहांना प्रिटोरियन गार्यानी किंवा तुर्कस्थानच्या पातशाहाला जानिझारींनी जसें धाब्यावर बसविले होते तसेंच हैदर नाइकाच्या गार्यानी चिक्क कृष्णराजालाहि बसविले व आपला नाइक जो हैदर त्याच्या हातांत मुख्य सत्ता दिली. निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या स्थळी इतिहासाची पुनरावृत्ति होते ह्मणतात ती ही अशी होते. हैदराचे वय ह्यावेळी सुमारे ५८ वर्षांचे होते व त्याने झैसूर संस्थानची चाकरी सुमारे २६ वर्षे केली होती. १७६० त हैदराने श्रीरंगपट्टण घेतले ह्मणून वुइल्क्स ह्मणतो. परंतु ते १७५९ च्या आगस्ट सप्टंवरांत त्याने घेतले असावें. कारण आमचें हे पत्र आक्टोबर १७५९ त लिहिले असावे असा अंदाज आहे व गोविंदपंताला श्रीरंगपट्टणची बातमी पोहचण्यास निदान दीड दोन महिने लागावे. तेव्हां १७५९ च्या आगस्ट-सप्टंबरांत हैदराने श्रीरंगपट्टण घेऊन तें संस्थान विच्छिन्न केले असावे हेच विशेष संभवनीय दिसते. दिल्लीहून श्रीरंगपट्टणास पत्र जावयास एकदां ४३ ( लेखांक ६) व एकदा ५२ ( लेखांक ८ ) दिवस लागले होते. हिंदुसंस्थान विच्छिन्न झाले हैं ऐकून गोविंदपंताला साश्चर्य खेद झाला असे दिसते. सर्व मराठ्या सरदारांचे लक्ष्य ह्या विलक्षण उलाढालीकडे लागले होते; असाहि गोविंदपंताच्या उद्गारावरून तर्क होतो. ह्यासंबंधी उल्लेख, कदाचित् सबंद पत्रे, मिरज मळ्यांतील पत्रांत असली पाहिजेत. कारण ह्यावेळी गोपाळराव गोविंद झैसूर प्रदेशांत होते. परंतु हैदराने केलेल्या ह्या उलाढालीसंबंधी उल्लेख ऐतिहासिक लेखसंग्रहातील पत्रांत कोठे केलेला आढळत नाही. ग्रांटडफनेंहि ह्या प्रसंगाचा कोठे निर्देश केला नाही. हा प्रसंग मराठ्यांना मोठा महत्वाचा होता. हैदर मध्ये आला नसतां तर श्रीरंगपट्टण खास मराठ्यांच्या हाती पडले असते, मराठ्यांचा व मद्रासेकडाल इंग्रजांचा निकट संबंध ह्याचवेळी येता व महाराष्ट्राच्या इतिहासाला निराळेच वळण मिळतें. येणेंप्रमाणे हैदराने दक्षिणेस व अबदालीने हिंदुस्थानांत मराठ्यांच्या आड येऊन इंग्रजांना पुढे येण्यास संधि करून दिली. ज्यावेळी हा प्रसंग घडून आला त्यावेळी त्याच्याकडे सर्व मराठ्या सरदारांचे लक्ष लागून गेले होते यांत संशय नाही. उत्तरेकडे अबदालीचा शह जर ह्यावेळी बसला नसतां तर " सगळी दक्षिण मोकळी करावयाची" असा सदाशिवरावभाऊचा बेत होता.