पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कष्टं झालों! त्यास, जीवावरील जोखीमधारा मोठी कठीण! त्यास पार येऊन जलालाबादेजवळ रोहिले, नजीबखाँनाचा लेक, दुंदेखीन, सादुल्लाखान, हफीज रहिमत, दाहा हजार फौज, दाहा हजार प्यादे जमा झाले आहेत. बाण, जेजाला, तोफा समागमें आहे. लढाई एक दोन जाली. तोफा, बाण, तोफा हिरोन घेतली. रोहिले याजकडील चाळीस पन्नास घेतली. घेरून आली आहों. रोहिले याचे लष्करी पीठ चार शेर जालें. घुगरी खातात. नजीबखानाच्या पलापावेतों गांव जाळिले. पुलाजवळ पन्नास घोडे घेतले. पुलाच्या दोन नावा तोडून टाकिल्या. नजीब चार रोजांत तेथून निघेल. त्यास, आमी या घोरांत पडलों. त्यास, पंधरा रोजांत येथील मुकदमा फडशा होईल. हफिजाकडून रात्रौ पत्रे आली. नरम जाले. सलूक करतील. तुह्मी प्रसंगी जाता. येथील सर्व तह्मांस सांगितले आहे. कोणी गोष्ट आह्मांकडील संशयाची चित्तांत न आणणे. ज्यामध्ये आमचे बरें तें जरूर जरूर तुझी कराल. दरबारी नानाप्रकारें नालिशी चुगली करितात. त्यास, बहुता ब्राह्मणांचे अन्न आहे. मजला साफ पैसेयास तफावत करणे नाही. येथून येतांच परगणेयांत जाईन. गांवचा पाहन पैसानपैसा ठिकाणी लावीन. सं० १८१३, सं० १८१४ दुसाला हिशेब जाले. रुजुवात करून जे कसर रयत व मामलेदार यांजकडे निघेल ते सरकारी जमेस येईल. सं० १८१५, सन तिसा हिशेब व रुजवात होणे तेहि होईल. दरबारचा रंग पाहिला. खावंद चौकशी करूं लागला. आतां पैसेयाचा लोभ धरून मेळविली अबरू ते कां गमवावी ? त्यास, आह्मीं सर्व आपले ध्यानात आणून सर्व तमांस सांगितले आहे. काही सांगावयास विसरलों असलो तर सर्व तुह्मीं स्मरण धरून सर्व उत्तमच करणे. आह्मी भवसमुद्री पडलो आहो. पार करणार ईश्वर आहे. मागाहन १८९ जाबताखान. EMERALATY १९० नजीबखानाचा सासरा. १९१ एक रोहिला सरदार. १९२ रोहिल्यांचा मुख्य सरदार. २८ EGE (सार्वजनिक वाचनालय