पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१३७7 ॥श्री॥ २१ आक्टोबर १७५९. दस्तक सरकार राजश्री जनकोजी शिंदे. ताहां कमाविसदारांनी व जकातदारांनी व बाजे राहादारांनी व जमीदारांनी व चौकीदारांनी महालानिहाय. सु॥ सितैन मय्या व अल्लफ. राजश्री त्रिंबक कृष्ण व रंजिश्री जनार्दन अप्पाजी फडनवीस दिमत राजश्री गोविंद बल्लाळ हे दक्षिणप्रांते जात आहेत. त्यांजबराबरी उंटे व स्वार व पडतळे व प्यादे भारबरदारी व तटें, बैलें आहेत व माणसें व बटकी असेत. तरी त्यांसी राहादारियाने कोणे बाबें मुजाहिम न होणे. एके घडीचा खोळंबा कोणाहिविसी न होतां सुरक्षित जाऊ देणे. नदी, नाला, नावांवरी पार करून देत जाणे. मुक्कामाचे जागा गांवगन्नाची माणसें जागले रात्रौ आपलाले हद्दपार बदरका माणसें व स्वार देत जाऊन पुण्यापावेतों सुखरूप पोहोंचावीत जाणे. ताकीद असे. जाणिजे. छ २९ माहे सफर. [१३८] ॥ श्री॥ आक्टोवर १७५९. पु॥ राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीः विनंति उपरि. इकडील वर्तमान तर श्रीगंगापार झालो. परंतु परमबांच्या मनोदयानुरूप त्यांचा रोख रोहिले व सुज्यातदौला यांना शासन करून बंगाल्यास जाण्याचा होता. रोहिल्यांशी झटापटी होतात न होतात तों अबदाली आला व शिंद्यांना बंगाल्यांत जाण्याऐवजी पाठमोरे वळून कुरक्षेत्राकडे कुच करून जावे लागले. १८५ त्रिंबक कृष्ण कानिटकर-मुजुमदार. १८६ जनार्दन आप्पाजी येरंडे--फडणीस. १८७ हा जनकोजीच्या कारकुनाचा हस्तदोष आहे. कारण जनकोजीच्या प्रांताची हद्द पुण्यापासून अनेक योजनें लांब होती. १८८ सरकारी कामदारांचा आतांप्रमाणे त्यावेळी मोठा दरारा असे असे दिसते. कारण एका घडीचाहि खोळंबा न करितां त्यांना पोहचविण्याची सर्व रामोशी, खलाशी, इत्यादि लोकांना सक्त ताकीद असे.