पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१५ [१३५] ॥श्री॥ २० सप्टेंबर १७५९. प॥ तीर्थरूपराजश्री गोविंदपंतदादा वडिलांचे सेवसीः विज्ञापना. श्रीमंत राजश्री माधवराव यांणी मजला आज्ञा केली की पंतास लिहून औरणे ४, उत्तम, लढावयासी योग्य असे आणून देणे. ह्मणोन आज्ञा केली, त्यावरून वडिलांस पेशजी लिहिले आहे. तरी आरणे उत्तम तरणे बळकट चांगले चार आधीं यावें. नित्य आह्मांस पसतात की पंतास लिहिले की नाहीं ऐसे नित्य पुसतात याजकरितां जलदीने पाठवावें. मित्ति भाद्रपद वद्य १४ हे विज्ञापना. [ १३६] ॥ श्री॥ श्रीमंत राजश्री राउस्वामीचे सेवेसीः विनंति सेवक बापूजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ छ १५ सफर पावेतों मुकाम दिल्ली यमुनातीर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विशेष. काशिदाबराबर एक दोन पत्रे पाठविली होती. सेवेसी प्रविष्ट जाहालींच असतील. यानंतर लष्कर यमुना दिल्लीजवळ उतरोन अंतर्वेदीत भागीरथीतीरी जाणार. ऐसा मजकूर आहे. कळले पाहिजे. दिल्लीचा कारभार झाला. अंतर्वेदीत जाऊन, जाटाची मामलत करून, रोहिले, सुजातदौला याचा कारभार करून, पुढे बंगाल्यास जावें ऐसा विचार आहे. विदित जाले पाहिजे. हे विज्ञापना. १८४ माधवराव बल्लाळाला काही अक्षरें बोबडी बोलण्याची व लिहिण्याची लहानपणापासून संवय असून ती थोडी मोठेपणींहि राहिली होती असे दिसते. ह्या पत्रांतील 'आरणे' हा शब्द ' हरणे' ह्याबद्दल आहे. पत्रे व यादींत (१८१) हातचें' बद्दल 'आतचे' माधवरावाने लिहिले आहे. बाबूरावाने 'आरणे' हा शब्द माधवराव ज्याप्रमाणे बोलत त्याचप्रमाणे कौतुकाने व थट्टेने लिहिला आहे. ह्या वेळी माधवराव १४।१५ वर्षांचे असावे. हे पत्र शिंदे लाहोरच्या स्वारीहून परत दिल्लीस आल्यावर लिहिले आहे. नानासाहे