पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपले लोकांस सांगन समय साधावें तें कांही दिसत नाही. त्यास काय इलाज करावा ? आह्मी दिक्क झालो. असो. चिरंजीव राजश्री बाबास व शिवरामपंत यांस पाठवणे. ते येथे येतांच आह्मी उमरगडी येऊन. तुह्मी उमरगडी येऊन चिरंजीव राजश्री बाबा व शिवरामपंत यांस पाठवणे. काय करावे ? सर्वांचे एकचित्त असते तेव्हां कार्य होते. रुसव्याखालींच दिवस गेले. पुढे काम कधी व्हावें ? सत्वर चिरंजीव बाबा येथे येतांच मी उमरगडी येईन. हिशेबाचं काम चालेल. वरकड भेटीनंतर बोलोन. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [१३४ ॥श्री॥ १९ आगस्ट १७५९. चिरंजीव राजश्री बाबा प्रति गोविंद बल्लाळ आशीर्वाद. उपरि येथील कुशल ता॥ भादो वद्य १२ जाणून आपले कुशल लिहित जाणे. विशेष. तुह्मीं काळी चिठी पाठविली त्यांत राजश्री जनार्दनपंत यांही आपले चित्तीं संशय मानून रुमाल ठेऊन गले हे लिहिले. त्यास, आझी त्यासी दुसरा विचार धरीत नाही. त्यांची कैदकानूंत काडीइतकी तफावत करीत नाही. त्यास, त्यांजलाहि आहीं पत्र लिहिले आहे. जामदारखानियावर कारकून ते ठेवणार तर सुखरूप ठेऊत. आह्मांस त्यांचे कारकून राहिलियाने वाईट काय ? ज्यामध्ये त्यांचे समाधान ते आह्मांस करणे. सुखरूप त्यांचा कारकून जामदारखानियांत ठेवणे. वरकड येथील वर्तमान तर काळी बिठुराहून कुच करून चचेडीस आलो. ॥ गोपाळराऊ यासी बिदा करून देतो. दोन कारकून त्याचे रुजवातीस देऊन आह्मी एका दोन रोजांनी येथील निर्गम करून उमरगडी येतो आणि सत्वरच श्रीमंत र॥ भाऊस्वामीकडे जाऊं. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.