पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१३ नाहींसें दिसते. तथापि रसदेपैकी काही ऐवज त्यांणी मागितला तर त्याप्रमाणे त्याजकडे देणे. बाकी ऐवज हुजूर पाठवणे. जाणिजे. छ २५ सवाल. सदर्ह रसदेचे ऐवजी तूर्त येथें सातलक्ष रुपयांचा भरणा करवणे. बाकी सात लक्ष रुपये राहिले, ते दसरापर्यंत चिरंजीवाकडे लागले तरी त्याजकडे देणे; नाहीं तरी, हुजूर पाठवून देणे. कांहीं बाबूरायापासून घेऊ. परंतु तुह्मीं भरणा लिहिलेप्रमाणे लेहून करवणे. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १३३] ॥ श्री॥ २५ जुरै १७५९. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामींचे सेवेसी: पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार. विनंति उपरि येथील कुशल ता॥ श्रावण शुद्ध १ मुक्काम सेगरनदी जाणून स्वकीय कुशल लेखन करीत आसले पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळले. त्यास, येथील वर्तमान तर लोकांनी हृद्द केली आहे. आपले महमदखान पांच हजार अर्जबाब मागतात, तेव्हां पार उतरून येणार. त्याचप्रमाणे । पाराजीपंतहि अडोन बसले. लोकांनी गवगवा केला आहे. एकंदर ते उतरून येत नाही. लाख रुपये आज येथे द्या तेव्हां पुढे पाय घालून. असे नानाप्रकारे पंच देऊन घेऊन त्यास आह्मी दिक्क जालों. आज बलबेर येथे पावलों असतो. एकंदर सिलेदार कोणी पाय घेत नाही. आह्मीं पुढे जावे तेव्हां मागून यावें. सेगरनदी पार आह्मी जालों तेव्हां मागून आले. असो. आज तीन रोज जाले. पाराजीपंत यांणी मोठा आडथळा केला. त्यास, बरें, खावंदाचें काम, यासमयीं त्यांणी १८. ह्यावरून गोविंदपंताची वरकरणी तरी पैशाची फार अडचण झाली होती असे दिसतें.