पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकूण चवदा लक्ष रुपये येणे. त्यास प्रस्तुत फौजेचे खर्चास व श्रावणमासचे दक्षणेस ऐवज पाहिजे. याजकरितां हे पत्र तुझांस लिहिले असे. तरी सदरहू ऐवजाचा भरणा सरकारांत करावयाविशी राजश्री बाबूराव नरसी यास लिहून पाठवणे. त्याप्रमाणे ते भरणा करितील. सालमजकुरी चिरंजीव राजश्री दादाकडे ऐवज द्यावयाचे प्रयोजन लागणार कीय कुशल लिहिणे. विशेष. तुझांकडे प्रांत हिंदुस्थानचे महालाची रसदेचा करार बितपशील. रुपये. ५५७००० प्रांत बुंदेलखंड. ७५०००० प्रांत अंतर्वेद. १३०७००० ( खाली भरणा कसा झाला याचा तपशील दिला आहे. ) १५ रमजान. सु॥ सवाखमसैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. संवत् १८०६, सु॥ खमसैन मय्या व अल्लफ, १६४९ । ५० ह्या सालाकरितां गोविंदपंताकडे ३९१६०६ ची नेमणूक पुण्याहून झाली. ही नेमणूक प्रांतांतील मुख्य तालुक्यांची ठिकाणे, किल्ले, गढ्या व हिऱ्याच्या खाणी ह्यांचा बंदोबस्त राखण्याकरिता लागणाऱ्या स्वार, प्यादे, कारकून व खासा ह्यांच्या पगाराबद्दल दिलेली होती. ह्यांत खासा गोविंदपंत ह्याजबद्दल खालील तपशील आहे. २२९० गोविंदबल्लाळ. १२०० खासा. १००० पालखी. ५० आफ्तागिरी. ४० दिवट्या. Foid २२९० ह्यावरून गोविंदपंताला पालखी शके १६७२ तच मिळाली होती असे दिसते. शके १६८१ साली आपल्याला पालखी मिळावी ह्मणून गोविंदपंतांनी खटपट केली ह्मणून 'बुंदेलखंड प्रकरणांत ' रा. पारसनीस लिहितात तें ज्यास्त खुलासा झाल्याशिवाय ग्राह्य दिसत नाही. मध्ये गोविंदपंताची पालखी काढून घेतली होती की काय ? किंवा वंशपरंपरा अगर तहाहयात पालखीचा मान त्यांना हवा होता की काय ? व तो त्यांना अगोदर मिळाला नव्हता की काय ?