पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०५ दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. या पत्राची नकल घेऊन हे सनद भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. छ २२ साबान. आज्ञा प्रमाण. [ १२५] ॥श्रीराम ॥ ४ मे १७५८. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामीचे सेवेसीः सेवक गोविंद भिकाजी कृतानेकशिरसाष्टांगनमस्कार. विनंति. उपरि येथील वर्तमान चैत्र वद्य १२ जाणून स्वामींनी आपले निजानंदवैभव दरघडी लिहीत जाणे. तेणेकरून सेवकास आनंद होय. विशेष. येथील वर्तमान तर, नवाब जाफरआलीखान पटण्ये प्रांतीचा बंदोबस्त करायानिमित्य आले आहेत. आहहीहि समागमें आहों. पटण्येचा बंदोबस्त तर राजा रामनारायण मात्र येऊन भेटला. आणखी जमीदार कोणी भेटले नाहीत. गयेचा सुंदरशा राजे येऊन भेटला. उभयताची मामलत, पटणची सुभेदारी, नवाब जाफरअलीखानाने आपले लेकाचे नांवें केली. त्याची नायब राजसुभेदारीची वस्त्रे राजे रामनारायणास दिली. इकडील बंदोबस्त करून नवाब जाफरअलीखान ता॥ छ १६ साबान कुच करून बंगाल्यास मजल दरमजल जात आहेत. पुढे जे काही वर्तमान होईल तें सदैव लिहिले जाईल. विशेष. सेवकाने श्रीमंत राजेश्री दादासाहेबास विनंतिपत्र पाठविलें, काही खर्चाविसी. त्यास, सेवकावर कृपावंत होऊन रुपये ५०० पांचशेंची वरात स्वामीचे नांवाची पाठविली आहे. आणि सेवकाचे पत्रांत लिहिले आहे की तुह्मीं वरात रुपये ५०० पांचशांची आपले मनुष्यासमागमें पाठवून देणे. ते तुह्मास पांचशे रुपयांची हुंडी करून ऐवज पावता करतील. त्यास, स्वामीजवळ रेरान कासीद समागमें वरात पाठविले आहे. १७९ मिरजाफर जून १७५७ पासून सप्टंवर १७६० पर्यंत बंगाल, बहार व ओरिसा या प्रांतांचा इंग्रजांच्या मदतीनें, नवाब झाला होता.