पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ रोज चालत नाही. तरी सुदामंतप्रमाणे करार करून घ्यावा ह्मणोन ". त्याजवरून हे सनद सादर केली असे. तरी मौजे मजकूरचे सायेरपैकी पातशाही बेगम यांणी दिल्याप्रमाणे च्यार आणे दररोज करार केले असेत. तरी मोगलाई अमलांत रोज चालत आलियाचा भोगवटा मनास आणून त्याप्रमाणे चालवणे. मोगलाई अमलांत चालत आले असेल तें बंद न करणे. चालत नसेल तें न चालवणे. प्रतिवर्षी नवीन आक्षेप न करणे. या सनदेची नक्कल घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. छ १३ साबान. आज्ञा प्रमाण. मोर्तब सुधा शिक्का आहे. बार ही आहे. [१२४] ॥ श्री ॥ १ मे १७५८. रोजश्री कमावीसदार, वर्तमान व भावी, परगणे फफूंद, प्रांत अंतरवेद, गोसावी यांसः स्नेहांकित रघुनाथ बाजीराव नमस्कार व आशीर्वाद. सु॥ समान खमसेन मय्या व अल्लफ. बिबी रहिमां वगैरे यांणी हुजूर कसबे लाहोरचे मुकामी येऊन अर्ज केला की नवाब मनसूरअल्ली व वजीर यांणी परगणे मजकूरचे सायेरपैकी रोज सहा आणे करून दिल्हे होते. त्याप्रमाणे चालिले. सरकारचा अंमल जाहालियापासून चालत नाही. तरी सुदामंतप्रमाणे करार करून द्यावे ह्मणोन. त्याजवरून हे सनद सादर केली असे. तरी मनसूरअल्लीखान वजीर यांणी दिल्ह्याप्रमाणे परगणे मजकूरचे सायेरपैकी दररोज रुपये - सहा आणे करार असेत; तरी सुदामंत चालत आल्याचा भोगवटा मनास आणून मोगलाई अमलांत चालत आले असेल त्याप्रमाणे चालवणे. चालत असेल तें बंद न करणे. चालत नसेल तें न चालवणे. १७८ लेखांक ५१ टीप पहा, हिंदुमुसलमान हा भेद धर्मात किंवा इनामांत पेशवे ठेवीत नसत.