पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यास, स्वामींनी कृपा करून पांचशे रुपयांची हुंडी करून मकसुदाबादेस ऐवज पावता होय तें करणे. हुंडी मकसुदाबादेच्या कासीदासमागमें पाठवून देणे. परंतु कासीदास लवकर बिदा करणे. जरूर. बहुत दिवस न ठेवणे, आह्मांवर खर्चाची बहुत तंगचाई आहे, ते पत्रीं लिहितां पुरवत नाही. याजकरितां सेवेसी विनंतिपत्र पाठविले आहे. स्वामीनों सेवकावर कृपा करून लवकर कासिदासमागमें हुडी करून रेसन कासीदास लवकर रवाना करून देणे, त्यापैकी रुपये ५ पांच रेसन कासीद यांस खर्चास देणे. बाकीची हंडी करून पाठवणे. त्या प्रांतीचें वर्तमान नवल विशेष कांहीं आलें असेल तर लेहून पाठवून देणे. बहुत काय लिहिणे. कृपालोभ असो दीजे..हे विनंति. [१२६] ॥ श्री॥ १४ फेब्रुवारी १७५९. पे॥ छ १५ जाखर, तिसा, माघ वद्य द्वितीया. सेवेसी विज्ञापना. येथील वर्तमान त॥ छ १३ माहे जमादिलाखरपर्यंत यथास्थित असे. विशेष. सरकारचे खिजमतगार राजश्री स्वामीकडे चौकीस आहेत. त्यांस सरकारांतून सालमजकरचे दसरियाचे कापड देविलें आहे. त्याची चिट्टी फडणिसाकडील जाहाली. खिजमतगारांनी चिट्टीप्रे॥ कापड घ्यावें तें न घेतां श्रीमंत महाराज मातोश्री पाआईसाहेब यांजबरोबर तातडीने निघोन आले. कापड घेतले नाही. त्यास, हाली सदहूं खिजमतगारांपैकी मनाजी जाधव व कुसाजी ढमढेरा दोन असामी कापडाची चिट्टी घेऊन स्वामीकडे आले आहेत. तरी जामदारखान्यांत सदहू चिट्टी। कापड द्यावयाची परवानगी देऊन यांची सत्वर रवानगी करावी. येथे चौकी नाजूक आहे. यास्तव खिजमतगार सत्वर माघारे पाठवावे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. " ताराबाई ह्यावेळी सुमारे ऐशी वर्षांची असावी; तरी देखील तिचा मानीपणा व हट्टीपणा तिळभरहि कमी झालेला दिसत नाही.