पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दौला याकडे आले. त्रिवर्ग खिलवतींत होते. इतकियांत कविजंग व मुरादखान आले. त्यास खिलवतेत बोलावून दोन प्रहर पावेतों एकांत जाला. सबब मनास आणितां शहानवाजखान याचा जाबसाल मुरादखान याचे मारफातकी होणार ते तो जाले. श्रीमंताची दोहीकडून बनली. तुह्मापासून जागीर घेतली; आपणापासोन द्रव्य घेणार. एकूण दोहीकडून नवाबाचें नुकसान. यास्तव निजामुदौला यांनी आपणास पदरी घ्यावे. थोडी बहुत सेवा करून दाखवीन. त्यास या जाबसालांत र॥ जानबा निंबाळकर व कविजंग यांस घेऊन निजामुदौलाशी बोलत असतात. नवाब बुभुक्षित बनले तरी करावयासी चुकत नाही ह्मणून एके द्वारें शोध लागला. त्यास आढळलें वर्तमान विनंति केली आहे. सरकारचे पत्राचे जाब सेवकाचें नांवें येतात. त्यास लाखोटा उकलला असतो. विदित होय. राजश्री रामचद्र जाधवराव शहागडास आलियाचें वर्तमान आहे. आगाजीसरगर व खाजे अलम याचे पुत्र व खंदारवाला राजा ऐसे त्रिवर्ग सात आठशें स्वारांनिशी अष्टीस बाहेर बुणगे ठेवून सडे आले. सलाबतजंग याची मुलाजमत जाली. तिसरे प्रहरी सलाबतजंग यांणी दरबार करून निजामुदौला यास दरबारास बोलाविले. त्याप्रमाणे नवाब व मीरमुसाखान, वाजदअल्लीखान जरोरच गेले. चार सा घटका दरबारांत होते. मुसाबुसी व जाफरअल्लीखान खुदावंदखानाचे पुत्र याकडे सलाबतजंग, बसालतजंग यांणी सांडणीस्वार रवाना केला की जलद येऊन पोहोचणे. सेवेसी विदित होय. हे विनंति. . [१२०1 ॥ श्री॥ ७ नोव्हेंबर १७५६. राजश्री रामाजी महादेव यांसिः (अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ दमाजी गायकवाड समशेर बहादूर दंडवत सु। सबा खमसेन मया अलक. प्रांतांत बखेडा मोगलाचा.