पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खान अलम व आजेचंद रोजे खबरेहून शहरास दाखल जाले. मुलाजमत होणार. सातशें स्वार समागमें आहेत. सुलतानजी व जानोजी वगैरेची मुलाजमत निजामअल्लीची जाली. येक दोन खलबती जाल्या. इभरामखान गाडदी व खंडागळे यांची मुलाजमत निजामअल्लीचे मारफातीने जाली. हे वर्तमान पूर्वी र॥ कृष्णाजीपंताचे पत्रीं लिहिले होते. विनांत करून श्रुत जालें असेल. श्रीमंतजीच्या थैल्या बसालतजंग व खोजे न्यामतुलाचे नांवें आल्या. त्या राजश्री विठ्ठलपंताच्या हस्तें गुजरल्या. उत्तर दिधलें की जाब उदयिक देऊ. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [ ११९] ॥श्री॥ ९ आक्टोबर १७५७. पे॥ छ २४ मोहरम भानुवासर, प्रातःकाळ पांच घटिका दिवस. सेवेसी विनंति सेवक शामजी गोविंद साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान त॥ छ २३ मोहरम शनवार सायंकाळपर्यंत स्वामीचे कृपादृष्टीकरून शहरी असो. यानंतर काल छ २२ रोजी शुक्रवार जुमा होता. सर्व कारभारी आपले आपल्या घरी होते. वाजदअल्लीखान व मुरादखान व विठोजी सुंदर व निजामुद्दौला ऐसे सायंकाळी एकांतांत होते. विशेष नव्हते ह्मणन विनंतिपत्र न पाठविलें. आज छ मजकुरी प्रातःकाळी वाजदअल्लीखान व विठोजी सुंदर दिवाण बसालतजंग याचे डेरियास गेले. चार घटका त्रिवर्ग एकांती होते. मतलब मनास आणितां निजामुद्दौला यांनी आपले जाबसालांत शेखअल्लीखान व रहिमदुल्लाखान गयासखानाचे पुत्र यांस बसालतजंगाकडे घातले आहेत. त्यांनी नवाब निजामुदौला याची बरखास्त सात आठ लाख रु॥ आमास द्यावे, वराड प्रांत दरोबस्त पायाघाट बालाघाट निखालस जागिरीत घ्यावे, तिसरे वाजदअल्लीखानास चार हजारी बलाये जागीर व झालरदार पालखी द्यावी, याच जाबसालाबद्दल जाऊन फिरून निजामु