पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशेषात्कारें धवळके, नडियाद घेऊन ठाणी बसविली. हजूर फौजेचे जाणे जलद त्या प्रांती होत आहे. तर राजश्री धोंडो मल्हार यांस घेऊन तुहीं स्वरेने येणे. छ १३ सफर. श्री मार्तंडचरणीं तत्पर पिलाजीसुत दमाजी गायकवाड निरंतर. - - - [ १२१] ॥ श्री॥ ६ डिसेंबर १७५७. राजश्रियाविराजितराजमान्यराजेश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासी:-पोप्य बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्माकडेस बुंदेलखंड वगैरे मामलत आहे. त्यास सरकार जमाबंदी देखील मोकासे व इनामदार व जकाती कुळ आकार होईल त्याजवर श्रीवज्रयोगिणीचे देवालयाचे बेगमीस धर्मादाय पट्टी रयेत निसबत एक साला दर सद्दे रु. ... नीमप्रमाणे द्यावयाचा करार करून हे पत्र तुह्मांस सादर केले आहे. तर कुल आकार होईल त्याजवर सदरहूप्रमाणे धर्मादायपट्टीचा ऐवज जमा करून राजेश्री शंकराजी केशव यांजकडे पावता करून पावलियाचा जाब घेणे. जाणिजे. छ २३ ॥वल सु॥ समान खमसेन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. बार. [१२२ ॥श्री ॥ २२ फेब्रुवारी १७५८. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्रि बाळाजी गोविंद स्वामी यासी:पे॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून १७४ कोळवणांत. १७५ वसईचा सुभा.