पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राउपर मसलत करीत बसले होते. ते तिसरा प्रहर जाला होता, उठले नाहींत. निजामुद्दीलाचे मानस कांहीं नाही. परंतु हे चौघे मिळूत खेळ करूं ह्मणतात. परंतु इमामुद्दौलापुढे पेश नेतील ऐसा प्रसंग नाही. निजामअल्लीने पांच हजार स्वार ठेवावयाचा हुकूम वाजदअल्लीखानास केला. पैकी दोन हजार मुरादखानास सांगितले की तुहीं ठेवणे. मागील शिबंदी, दणे तोच दंगा होणार ! पुढे ठेवून काय देतील ते पहावें ! शामजी टकले तेथील वर्तमान लिहीत असतील. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. ११८] ॥श्री ॥ ९ आक्टोवर १७५७. पे॥ छ २४ मोहरम रविवार प्रातःकाळ पाच घटिका दिवस श्रीमंत सद्गणमूर्ति राजश्री रावसाहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक साष्टांग नमस्कार विनति उपरि येथील क्षम ता॥ छ २४ मोहरम शनवार कुशल. यानंतर कृपावलोकनकरून छ २२ रोजीचें आज्ञापत्र सादर जालें तें छ २४ रोजी एका प्रहरा पावले. शिरसा वंद्य करून भूषण जालें. राजश्री विठोपंत आज्ञेप्रमाणे छ २३ रोजी शहरास पावले. नवाब दरगाहकलीखान याची भेटी घेतली. छ मजकुरौं गाडदी याच्या लोकांनी कोण्हास इतला न कळता सातारियास जाऊन पंचवीस मनुष्य घोडे हरपले हा बहाणा करून धुंद केली. दीक्षित स्वामींचे गुमास्तियास घेऊन लष्करांत रात्रीस आले. निजामअल्लीस तेचसमयीं अर्ज जाला त्यांनी इभराईमखान गाडदी यास ताकीद केली तो मुलकीर झाला की इतला नाही, त्यावरून माणसास ताकीद केली. वराडच्या गृहस्थाचा मनोदय आहे की शिबंदीचे ऐवजामध्ये वडील बंधूपासोन तालुका शहराचा घ्यावा. परस्परे जाबसाल खलबत वाजदअल्लीखान व विठोपत वगर बन्या बाबत आहेत निश्चय मुकरर जाला नाही. दौलताबादकराचाहि जाबसाल एका गृहस्थाचे विद्यमाने जाबसाल सुरू आहे. पक्क जालिया लिहिला जाई