पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ की आह्मांस शिबंदीचे देणे आहे. सोळा लक्ष रु।। द्यावे. उत्तर सांगून पाठविलें की तुह्मी वडील आहांत, खजान्याचा झाडा मनास आणोन पैसा खजान्यांत असलिया घऊन जाणे. पैसा असतां तरी शिपाई लोकांचा दंगा बंदमानअल्लीवर कशास होता ? परस्परें जालें वर्तमान तुह्मीं एकिले असेल. कोणे प्रकारे शिपायांची समजावीस करून थोपाथाप केली आहे. एवंच कांही जागिरा बालाघाट परगणे घेतील ऐसे दिसते. शहानवाजखानाचा मनोदय आहे की निजामुद्दौलास आपल्या कामांत आणावें. इभ्राईमखान गाडदी याचे मारफाताने पूर्वी लष्करांतहि जाफराबादचे मुक्कामी पत्रे गेली होती. हल्ली आतां येथें आलियावर नजर पांच मोहरा व मेव्याची डाली आणि अर्जी गाडद्याचे मारफातीने गुजरोन जाबसाल लागला आहे. पुढे काय होईल तें पहावे. वाजदअल्लीखान आज इमामुद्दौलाचे घरास आले होते. खाजे रहमदुल्लाखान निरोप घेऊन बाहेर आले तो वाजदअल्ली खान व ते एक ठायीं बसोन गोष्टी जाल्या. मग वाजदअल्लीखान आंतील डेन्यांत बसालतजंगापाशी गेले होते. मग काय विचार झाला असेल तो मनास आणून उदयिक लेहूं. इमामुद्दौला निजामुद्दौलास ह्मणों लागले की एक सरदार रघोजी करंड्या जानोजी भोसल्याचा होता. त्यासी तुमच्याने बरं ठेवले नाही. तो भोसल्या श्रीमंताचा आज्ञाधारक. जे काही त्यास आज्ञा व्हावी त्याप्रमाणे वर्तणक करावी. ऐसा प्रताप श्रीमंताचा आहे. त्याशी आपण स्नेह करून असल्या उत्तम आहे. इतक्यावर तुमच्या मनांत यत नसिले तर तुझी वडील आहांत. आपले उत्तम जाणाल तें करणें. आमी तुमचे हमराहा आहोत. उत्तर कांहीं केलें नाहीं. उगेच राहिले. इमामुद्दौलाच्या केल्यास मोडवतें ऐसा अर्थ दिसत नाही. हा कालवर इमामुद्दौलाची मिजाज सरकारकामावर कायम आहे. निजामअल्लीवर शिबंदीचा दंगा अखेरचांद जाल्यावर होणार आहे. विठ्ठल सुंदर दोन लाख घेऊन आले ते वाटले. कोणास दोन, कोणास तीन रु॥देऊन चांदापावेतों समजाविले आहे. आज निजाम अल्लीपाशी वाजदखान व इभ्राईमखान व मुरादखान व विठ्ठल सुंदर दों प्रह