पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९७ सलाबतजंग हजीमहंमदअल्लीखानाच्या बागांत प्रहरादिवसा उपरांतिक सहल करायास दोन जनाने हत्ती व कांहीं खानग्या घेऊन गेले होते. ते एक घटका रात्रीं डेरेदाखल जाहले. निजामअल्लीखानाचे एथें पिछले प्रहरी दिवसा इभ्रामखान गाडदी व कविजंग व शेखअल्लीखान जुनेदी याचा जावाई दखनीमिया व मुरादखा हे चौघे व नवाब निजामअल्ली ऐसे पांचजण एक घटका रात्रपर्यंत खलबत झाले. उपरांतिक उठोन आपलाल्या डेन्यास गेले. नवाब बसालतजंगाच्या येथंहि पिछले प्रहरी दरबार जाला होता. मातबरपैकी हैदरयारखान दिवाण व दरगाकुलीखान व मीरसेदू कोतवाल व कमालदी हुसेनखान व खोजे अबदूलरहमान बक्षी व मीरनजरग्वा बक्षी व मिस्रीखा मनसबदार वगरे ऐसे मिळोन सा घटकापर्यंत दरबार जाला होता. खलबतचें वर्तमान काही कळण्यांत आले नाही. परंतु बाहेरील वर्तमान जिनसीचे तोफखान्याचे बैल तमाम नायगांव गणोरीच्या डोंगरांत चराईस लाविले व मुसाबुसी फिरंगीहि हैदराबादेस दाखल जाल्याचे वर्तमान काल येथे आलें. फिरंगीहि लौकरिच मजलदरमजल यास सामील होणार. तो येऊन पोहचेतोवर सला अथवा लढाई होत नाहीं ऐसा रंग दिसून येतो. कितीक मातबर माणूसच बोलतात जे फिरंगी आल्याशिवाय सला बिघाड होत नाही. यांनी दिरंगाखाले घातले आहे. सल्याचा रंग दिसत नाही. बारीक मोठे वर्तमान सर्व तहकीक जाल्यावर सेवेसी लिहितों. हे विज्ञप्ति. [ ११७] ॥श्री॥ ८ आक्टोबर १७५७. . छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ. सेवेसी महिपतराव लक्ष्मण सा॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे:- येथील वर्तमान ता॥ छ २२ मोहरम शुक्रवार सायंकाळ जाणून प्रताप स्वामीचा यथास्थित असे. विशेष. दरबारचें वर्तमान निजामुद्दौलाही इमामुद्दौलास सांगन पाठविलें