पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ चून उगा राहात नाही. विठोजीपंत व मुरादखान वाजीदअल्लीखानास बहुत विचार सांगत आहेत. शहरांत तमाम प्रगट जालें की मुलुख मागत आहेत. कळावे. खोजे रहिमतुलाखानाचे खलितियाचा जाब आलियावर बाबासाहेब रवाना करतील. लाला महारायास तो फार बरे वाटत नाही. ताप येतो. निजून राहिले आहेत. दरबारास जात नाहीत. हकिमजीचे पत्र त्यास दिल्हें. त्यांत पत्र खोजे रहिमतुलाखान बहादूर व फतहुदीअल्लीखानाचे होतें तें माहारायांनी दिल्हें. खोजे रहमतुलाखांनी जाब लेहून महारायासी पाठविला. त्यास आपण जाब मागावयासी गेलो होतो. उत्तर दिल्हे की पाठविले. तेथें हकीमजीपाशी शोध घ्यावा. साहेबज्यादे आणि तुशलीमेब यांचे पत्र स्वामींहीं मुसस्तायेदखानास पाठविलें तें त्यास दिल्हें. जाब घेऊन पाठविला असे. तो जाब साहेबज्यादे हुल्याएकवलयास गुजराणावा. दुसरें पत्र स्वामीस पैठणचे चलहुचे तुमचेसाठी व सकोपंताचे गुमास्तियाचे बिजहराबमोजीब गौर करणे याविशी लिहिलें तें सकोपंताचा गुमास्ता सेवेसी प्रविष्ट करील. त्याचप्रमाणे गौर करावा. हे विज्ञापना. [ ११६] ॥ श्रीगणराज ॥ ८ आक्टोबर १७५७. पे॥ छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ. सेवेसी विठल शामराज व गुणाजी नाईक मु॥ शहर नौरंगाबाद जुना बाजार चरणावर मस्तक ठेवून सा॥ नमस्कार अनुक्रमें दंडवत विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ भाद्रपद वद्य शुक्रवारपर्यंत स्वामीच्या कृपादृष्टीकरून स्वस्त असो. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जालों ते आज प्रहरा दिवसा मुकाम मजकुरास दाखल जालों. नाइकाची आमची भेटी जाली. एके जागाच आहों. दो प्रहराउपरांतिक लष्करांत गेलो. थोडे बहुत सैन्य पाहिले. नाइकांनीहि कितीक जबानी मजकूर सांगितला. आज दिनचर्येचें वर्तमान नवाब