पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व त्यांतल्या त्यांत समाधानकारक माहिती देण्याचा होता. मराठ्यांचा इतिहास कसा तरी ओरबाडून जो त्याने काढिला त्याचे मुख्य कारण हेच आहे. त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला तो मराठ्यांच्याकरितां लिहिला नसून आपल्या देशबांधवांकरितां लिहिला आहे. मराठ्यांच्या पराक्रमांचे कौतुक वाटण्याचे त्याला काहीच कारण नव्हते. मराठ्यांचे बहिःस्वरूप मोठ्यांत मोठे होतें केवढे व तें तसें कसकसें होत गेलें एवढे त्याला दाखवून द्यावयाचे होते. व तें काम त्याने समाधानकारक केले आहे असे त्याच्या देशबांधवांचे मत आहे. मराठी बखरींच्यापेक्षा त्याचा इतिहास जास्त व्यवस्थित आहे हे इकडील लोकांसहि मान्य आहे; परंतु, स्वतंत्र इतिहास ह्या नात्याने त्या ग्रंथाची किंमत महाराष्ट्रांतील इतिहासज्ञ निराळी करितात. कां की, (१) ग्रांट्डफ्नें आपला इतिहास मुख्यत्वें मराठी बखरी, मुसलमानी तारिखा, सरदारांनी दिलेल्या कैफियती व अशाच स्वरूपाची इतर टिपणे, ह्यांची संगति जुळवून तयार केला आहे. ह्या बहुतेक बखरी, तवारिखा व कैफियती कमजास्त प्रमाणानें अविश्वसनीय आहेत व त्यांच्या आधारावर रचलेला मराठ्यांचा कोणताहि इतिहास, अपूर्ण व अविश्वसनीय होण्याची बहुतेक खात्री आहे. (२) पुणे व सातारा येथील दफ्तरें व दुसरी अवांतर कागदपत्रे ग्रांटडफ्ला मिळाली होती हे खरे आहे. परंतु, त्याचा त्याने योग्य उपयोग करून घेतला नाही. काव्येतिहाससंग्रहांतील पत्रं, ऐतिहासिकलेखसंग्रहांतील पत्रे व मी सध्या छापिलेली पत्रे ही सर्व मिळून १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील अशी सुमारे ४५० साडेचारशें होतात. त्यांवरून ह्या अकरा वर्षांतील ग्रांटडच्या इतक्या चुका दाखवून देतां येतात, त्याअर्थी निदान ह्या अकरा वर्षासंबंधी तरी ग्रांटडफ्नें पुणे व सातारा येथील दफ्तरांचा योग्य उपयोग करून घेतला नाही असें बिनदिक्कत ह्मणतां येतें. ( ३ ) योग्य शिक्षणाच्या अभावामळे कोणताच इतिहास लिहिण्याची व विशेषतः मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची ग्रांटडफ्ची योग्यताच नव्हती. पुणे व साताऱ्यांतल्यासारिखीं भरपूर माहितीने भरलेली अवाढव्य दफ्तरें जेम्स् मिल्ल, गिवन, मोम्सेन, इन्ह, गिझो इत्यादिसारख्या शोधकांच्या हाती पडली असती तर, त्यांचे त्यांनों बावनकशी सोने करून दाखविलें असतें. (४) तो विदेशीय असल्या कारणाने मराठ्यांच्या पराक्रमांचा पाल्हाळ तर राहं द्याच; परंतु, सविस्तर व साद्यत माहिती देण्याची त्याला हौस नव्हती. विदेशीय लोकांना मराठ्यांच्या हालचालीच सामान्य ठोकळ ज्ञान झाले ह्मणजे आपले काम झाले अशी ग्रांटडफ्ची समजूत होती. (५) त्याने आपला इतिहास भौतिक पद्धतीने लिहिलेला आहे व तोहि अनेक प्रकारे अपूर्ण झाला आहे. ह्यामुळे त्याच्या इतिहासाला, कीर्तने ह्मणतात त्याप्रमाणे, अपूर्ण असा मराठ्यांच्या मोहिमांचा नामनिर्देशात्मक इतिहास असें मटले असतां चालेल. ग्रांटडच्या इतिहासाला मोहिमांचाहि इतिहास ह्मणतां येत नाही. कारण, मराठ्यांनी ज्या शेकडों मोहिमा केल्या त्यांपैकी फारच थोड्यांचा ह्मणजे एकीचाच त्याने काहींसा सविस्तर वृत्तांत दिलेला