पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. वाकीच्यांचा वृत्तांत कांहींच दिला नाही. तेव्हां ' मराठ्यांच्या माहिमांचा इतिहास असेंहि नांव ह्या इतिहासाला शोभत नाही. ह्या इतिहासाला " इंग्रजांना मराठ्यांची कांहीं माहिती देणाऱ्या वृत्तांताचें इतिहासवजा पुस्तक " असें नांव दिले असतां चालेल. ____ ग्रांटडफ्चा इतिहास अपूर्ण व जुनापुराणा होण्याची ही अशी कारणे आहेत. ही दाखवून दिली नसती तरी देखील चालण्यासारिखें होते. कारण, ग्रांटडफ्च्या ग्रंथांत चुका आहेत असा संशय आल्याची चिन्हें अलीकडील १०।२० वर्षांतील लिहिण्यांत व बोलण्यांत थोडथोडी दिसू लागली होती. परंतु, कोणांहि स्पष्टपणे ग्रांटडच्या ग्रंथांत अमक अमुक चुका आहेत असे दाखवून दिले नव्हते. ह्या एवढ्याच कारणाकरितां मला हे दोष दाखवून देण्याचे कंटाळवाणें काम निरुपाय ने करावे लागले आहे. शिवाय, आणीकहि एक आनुषंगिक कारण झाले. ते असे की, ग्रांट्डनें आपला इतिहास भौतिकपद्धतीने लिहिला असल्याकारणाने वाचकांचा मराठ्यांच्या कृत्यांसंबंधों काही एक चमत्कारिक ग्रह होऊन जातो. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला प्रारंभ होण्यापासून तो नाना फडणिसांच्या अखेरीपर्यंत मराठ्यांनी शेंकडों मोहिमा हिंदुस्थानांतील सर्व प्रांतांतून केल्या. इ. स. १६४६ पासून १७९६ पर्यंत एकहि वर्ष कोठेनाकोठे तरी मलखगिरी केल्याशिवाय मराठ्यांनी सुनें जाऊ दिले नाही. ग्रांटडपच्या ग्रंथांतील ह्या मुलुखगिन्यांची कोरडी जंत्री पाहिली व त्याने ह्या मुलखगिन्यांची केलेली थट्टा वाचली ह्मणजे वाचक क्षणभर स्तब्ध होऊन आपआपल्याशीच विचार करितों की, काय हो हा चमत्कार आहे ! एक सारिखें दीडशे वर्षे एक वर्षाचीहि खळ पडू न देतां ह्या सैतानांनी सर्व हिंदुस्थानभर केवळ हुतूतु की हो घातला ! शेतें, वाड्या, गांवें, शहरें जाळून व पोळून प्रांताचे प्रांत ह्या राक्षसांनी उध्वस्त करून टाकिले ! लढाईच्या वेळेस शत्रूला हातघाईस आणण्यास संस्कृतराष्ट्र ही असली कृत्ये कधी कधी किंवा वारंवारहि करितात; परंतु त्यांत त्यांचा काही तरी स्तुत्य हेतु असतो. ह्या मराठ्यांचा मात्र प्रकार कांहीं विलक्षणच! हेतु ह्मणावा तर लूट मिळविण्याखेरीज दुसरा कांहींच नाही ! ह्या मोहिमेचा पत्ता त्या मोहिमेला नाही ! कांहीं कारण नसतां, पावसाळा झाल्यावर ह्या दुष्टांनी पुण्याहून जें तडक निघावें तें कांहींनी श्रीरंपट्टणावर घाला घालावा, कांहोंनी अमदाबादेवर झांप टाकावी, काहींनी अवरंगाबादेला बुचाडावे व काहींनी खुद्द दिल्लीच्या पातशाहाच्या मानगुटीस बसावें ! एका काठी ह्या दरोडेखोरांनी हिंदुस्थानचें सार्वभौमत्व पटकावून बसण्याचा प्रसंग आणिला होता; परंतु, खरोखर देवाचीच करणी ! ह्मणून हा अघोर प्रसंग हिंदुस्थानच्या निरुपद्रवी प्रजेवर आला नाही. हे असले विचार कल्पक वाचकांच्या मनांत ग्रांटडपचा इतिहास वाचून येतात, हे मेकॉले, गोपाळराव हरी देशमुख इत्यादींच्या लिहिण्यावरून ध्यानात यण्यासारिखें आहे. ह्या असल्या विचारांचा पगडा अजूनहि गेला नाही. हेहि सप्रमाण सिद्ध करून दाखवितां येईल. मराठ्यांच्या अमदानींत जिकडे तिकडे दंगेधोपे, लढाया व मुलुखगिऱ्या ह्यांचा सुळसुळाट होऊन