पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११४] ॥ श्री ॥ ७ आक्टोबर १७५७. प॥ छ २२ मोहरम शुक्रवार संध्याकाळ. श्रीमंत सद्गुणमूर्ति राजश्री रावसाहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ २२ मोहरम पावतां साहेबाचे कृपावलोकनेकरून कुशल असे. विशेष. छ १६ ची विनंतिपत्रे दोन प्रविष्ट होऊन आज्ञापत्र सादर जालें तें लाखोटा छ मजकुरी, दुसरे छ १७ चे आज्ञापत्र खुले राजश्री अवधूतरावजीपाशी सादर जालें तें छ १९ रोजी पावले. मस्तकी वंदून परम सनाथ जालों. आज्ञेप्रमाणे सरकार कामावर गुणाजी न!! हरकारे यास ताकीद करून जातमी वगैरे वर्तमान शोध करून विनंतिपत्र पे॥ जाईल. यानंतर छ ११ माहे मजकुरीं मुसाबुसी व हैदरजंग फिरंगी हैदराबादेस दाखल जाले. वर्तमान तांब्रास आले. छ २० रोजी निजामअल्ली याचे घरी जानोजी निंबाळकर दोन घटका रात्रीस आले. सा घटकापर्यंत खलबत केले. त्या उपरि निंबाळकर रुसखत होऊन गेलियावर लक्ष्मण खंडागळे यास बोलावून चार घटका खलबत केले. किले आरकामध्ये सरंजाम गोळी वगैरे तयार करीत आहेत. कितेक वर्तमान तहकीक होऊन कितक जबानी हरकारे बातमी लिहिले जाते. हुजरचे पत्र खुलें सादर होतें याविशी हरकारे यास ताकीद जाली प॥ की हरयेकापाशी न दाखवीत. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [११५] ॥श्री॥ ८ आक्टोबर १७५७. मा पे॥ छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ. संवेसी भगवंतराव यादव सा॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे. आज छ २२ मोहरमचें वर्तमान तर आपण प्रातःकाळीं शोधार्थ गेलो होतो. मुरादखानाने वाजीदअल्लीखाजीशी फार रत्न केला आहे. दोन हजार स्वारांचा