पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांणी सांगोन पाठविलें की मजला ताप घाम फार आला आहे. आज्ञा होईल तरी ऐसा येईल. मग ह्मणों लागले की सकाळी येणे. आपण हकिमजीची पत्रे आली त्यावरून कळले असेल ऐसें मटले नाही. सबब की इशारा नव्हता. आणि परभार त्याचे वकिलाने दिल्ही ऐसेच कळावें ह्मणोन हे गोष्ट खोजे रहमतुल्लाखानापाशी झटले नाही. कळावें. उदईक महारायास जाब मागून सेवेसी लिहिले जाईल. माहाराय ह्मणत होते की हकीमजीने मजला काही लिहिले नाही. संकलित लिहिले आहे. दुसरें ह्मणत होते की मी एकदा वाजीदअल्लीखानास भेटलों. त्यास मजकुर केला. जो सलुक श्रीमंतांहीं केला तो कायम करवलिया उत्तम आहे याची मवाफिकत कामास येईल. त्यासी बिगाडून पुरी पडणार नाही. जर अगोदर श्रीमंताकडील दृष्ट स्नेहाची करते तर रघूजी करांडियाचा पडचाकर काशास करिता. आतांहि श्रीमंताचा स्नेह संपादावा. त्याची पत्रे भोसलियासहि यावी ह्मणजे त्याजवर दबाव राहील. घरांत कांहीं मागणे असेल तर भावासी थोडें बहुत मागणे. परंतु श्रीमंतांशी स्नेह ठेविजे. ऐशा गोष्टी सांगितल्या. त्याणे मागती बोलाविले. त्याचेजवळ दीड प्रहर रात्र याजकरितां जाणें जालें नाही. परंतु एकदो रोजा जाईन. दुसरें, जानोजी जसवंत व विठोजी सुंदर व मुरादखान ऐसें चाहत नाही. हे यश अणिकास द्यावे. परंतु यश राजेबहादुर झणजे स्वामीस येईल ऐसे सांग कळावें ह्मणोन लिहिले असे. सरफराजखान सुभेदार हैदराबादेचा रुखसत जाहला. व जे दिवशी पालखी झालरदार शौरजंगास आली ते दिवशी सरमस्तखानाचे पुत्रास मातमचा खिलयत जाहाला. निजामुदौल्याचे सैन्यामध्ये गेलो होतो. तेथें शोध करितां कळलं की महमद असलमखासुभेदार बुराणपूर शोरबा चेवीस निजामुदवलास पाठविले. त्याची रसीद घ्यावयास त्याचा खानसामा आला होता. कळावें. सैदलकरखानाचा भाऊ जरीफखान. त्याससैदलष्करखान बहादर यास-किताहाब सैदलष्करखान बहादुर जाहाला. हे विज्ञापना.