पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोष्ट काढून बजिकीर केला की आझांस आगोदर बोलाविलें, मग मवकुफ केलें, मागती बोलाविलं. याजकरितां आपण पंधरा सोळा लाखाचे खिसारतेंत आलो. त्याचे उत्तर साहेबी दिधलें की तुह्मीं पन्नास लाख रुपये मिळविले. नवाब निजामुदवलांहीं पुसिलें की कैसे ? यांणी उत्तर दिधलें कीं या दिवसांत येऊन भावास भेटले, शरीक जाले हे आबरु व नाम जाले, हेच लाखों रुपयांचे जागा आहे. मग साहेबाची तारीफ फार केली की तुह्मी आमचे वडिलापासून दवलत पाहात आहां. ऐसी तारीफ करून शिरपेच मुरसा आपले हातें बांधिला. मग साहेब रुकसत होऊन घरास आले. हे वर्तमान राजाजीस लिहिले आहे. ऐसें विठ्ठलरावजीने सांगितलें तें सविस्तर बाबासाहेबास निवेदन केले. त्याजउपर श्रीमंत साहेब जादियाचे पत्र लाला माहाराय वकील यास व हकीम महमदअल्लीखान याची पत्रे दोन येकूण पत्रे तीन पावली ते पावतांच माहारायास पावती केली. त्यांत येक पत्र खोजे रहिमतुलाखान बहादुर व येक फतहुदीअल्लीखान बहादुर यास होतें तें पत्र माहारायाने उभयतांस पावती केली व मुसाहेबखानाचे पत्र म्यां जाऊन दिधलें. सालारजंगाचा खलिता श्रीमंत बाबासाहेब आपण जाऊन दिधला. सेरजंगांहीं देतील. आपण संध्याकाळी खोजे रहिमतुलाखान बहादुर याचे येथे गेलो होतो. तेथें खोजे कमालुद्देअल्लीखान काजी व फतहुदीअल्लीखानजी बसले होते. दोन तीन घटका बसले. मग बाबासाहेबाचे तबियतीचे वर्तमान पुसले. उत्तर दिले की आतां आराम आहे. परंतु नाकुवत फार आहे. मग ह्मणों लागले की आमची दुवा फार फार सांगणे. मग अलीकडे हिकडील पुसिलें की काहीं यार मदाराचा जाबसाल लागला आहे की नाही ? स्वामीचे पत्री लेख नवता आणि बाबासाहेबाचाहि हेत नवता. मग उत्तर दिधलें, जाबसाल दरपेशच आहे, होईल. मग उत्तर दिल्हे की राजाजी जैसे लिहितील तैसा इतला आमास देत जाणे. अवश्य ह्मणून आलो. त्यास महारायास पत्रे दिधली. त्याची तबियत कहली ताप आली हे मी पाहून गेलो होतो. खोजे रहमतुलाखानांहीं माहारायास बोलाऊ पाठविलें होतें.