पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१ - ॥ श्री॥ ६ आक्टोबर १७५७. पे।। छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय. सेवेसी भगवंतराव यादव सा॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजेः- आज छ २० मोहरमी दरबार जाला. हसनअल्लीखान कोतवाल हयेदराबादेस आला. वस्त्रे त्यास इनायेत जाली. मुगटराय नामे बफाचाकीचा मुशरीफ होता. त्यास जिजा यल आदाजाचे मुशरीफचा शिरपेच जाला. पहिले दरोगा जिजायल आदाजाचा शहानवाजखानाचे येथे होता. त्यास इस्तकमलचे वस्त्र जालें. त्याजउपरांतिक बंदगानअल्ली व नवाब बसालतजंग आंत उठून गेले. मग बसालतजंग स्वार होऊन नवाब निजामुदवलाचे डेरियांत गेले. समागमें गुलाम नक्षबंदखान व आर्जबेगी वगैरे होते. आपणहि त्याचे सैन्यांत गेलो होतो. दीड प्रहर दिवस जालिया वाजीदअल्लीखान व विठोपंत दिवाण व रहिमतुलाखान, गयासखानाचा पुत्र, ऐसे खिलबतेंत होते. माजनखान कोतवाल बाहेरले दिवाणखानियांत होते. मग बसालतजंग निजामुदवल्याचे डेरियांत आले. सैन्यांतून फिरतेवेळेत महाराज अर्जुनबहादुर जानोजी जसवंत निंबाळकर याचे हवेलीत गेलों तों ॥ विठ्ठलराव बाहेरून आले. त्याची व खंडेरावजींची भेटी झाली. विठलरावजीस बाबासाहेबाचा नमस्कार सांगून वर्तमान पुसले. त्यास त्यांही सांगितले की परवा विठोजी सुंदर दोनदां आले. आजी साहेबास मणजे महाराजे अर्जुनबहादुर यांस ह्मणों लागले की आमचे यजमान निजामुदवला तुमचे हवेलीवरून दोनदां गेले आणि तुह्मी भेटले नाहीत. त्यास साहेबी झटले की आह्मी ज्याचे ताबेदार त्याची मरजि पाहिजे. आणि आह्मास भेटलियावांचून गरज काय ? हे वर्तमान विठोजीपंती गुलाम नक्षबंदखानास सांगितले. त्यांहीं नवाब बसालतजंगास सांगून परवानगीचा राका आपले मोहरेनसी साहेबाचे नांवें पाठविला. साहेबी उजूर केला की मी जात नाही. मागती नवाब बसालत यांणी आपले हातें रुका लिहिला की निजामुदवला आमचे भाऊ आहेत, त्यास आवश्यक भेटावें. आग्रह देखून साहेब काल थोडासा दिवस राहतां भेटीस गेले. निजामुदवलाहि गोष्टींत