पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून पाठविलें तें पाऊन सविस्तर अवगत जालें. अस्सल पत्र रवाना केलियावर फतहुदीअल्लीखान बहादूर यांचे येथे गेलो होतो. वर्तमान ध्यानास आणिलें तो सर्व कुशल असे. नवाब निजामुदवलासी व बसालतजंगासी स्नेह फार जाला आहे. हायदरयारखान दिवाण याचे बागांत जियाफत मुकरर जाली आहे. माजजखान कोतवाल दिश्वड त्यांचे बागांत जाऊन चहुतरे वगैरे तयार करितात. आराईश मोठी करणार. आतशबाजीहि तयार करविली आहे. तेथे सोडतील. शहानवाजखानाचे दारमदारांत निजामुद्वला येत आहेत.इभराईमखा गाडदी व खंडागळे हे जाबसाल आणवीत आहेत. त्यांचेहि लेख यांजला येतात. कळावे ह्मणोन लिहिले असे. बसालतजंग हवेलीत आले होते ते मागती डेरियास गेले. वराडप्रांतीचे बालाघाट व पायाघाटचे माहाल कुल निजामुदवला दरखास्त करितात. बसालतजंग पाईघाटचे कांहीं देतात. ऐसी रदबदल आहे. काबिलखानास बाळापूरचे काम देतात. पयसा मागत आहेत. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [ ११२] ॥ श्री॥ ६ आक्टोबर १७५७. पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय. भगवंतराव यादव. फतहुदीखान याचे जबानी हिंदोस्तानचे वर्तमान ऐकिलें की वजीर व श्रीमंत दादासाहेब व आणखी सरदार फौजेचे एकत्र होऊन पठाणास जेर केलें. पठाण दबला. शेवटीं सलूख पठाणाने करून गेला. वजीर व दादासाहेब एकत्र होऊन पुढे लाहोराकडे चाल केली. आतां याजपुढे कोण्ही धीर धरीत नाही. कळावे. हे विज्ञापना. GENERAT साचजानेक साताकालय (PWOOD