पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बागांत मेजवानीचा सरंजाम होतो. उभयतां वडील बंधूस नेऊन मेजवानी शुकुरवारी करणार आहेत. तयारीसाठी काजीजखान कोतवाल चार पांच दिवस जाले की बागांत जाऊन मजलिसीचा सरंजाम आतषबाजी व रोषनी वगैरे तमाम बागाचे आसपास चउत्रे बांधले आहेत. निजामअल्लीहि जवाहिर व कापड भावास द्यावयास खरीद करीत आहेत. तेहि आपले डेयास नेऊन मेजमानी करण्याचे विचारांत आहेत. इतकियावर काय तजवीज होईल तें न कळे. शहानवाजखानांहीं शहामहमूद यास उत्तर लिहिले की पूर्वीपासून जाबसाल श्रीमंताशी आहे. आतां अनेकाकडे लावणे उत्तम नाही. जें करणें तें श्रीमंत करतील. मेव्याच्या डाल्या तिघां भावांस पाठविल्या आहेत. अर्जी केली की बरावाईट तुमचा आहे. बेहत्तर जाणाल तें करणे. श्रीमंताचे ताकीदपत्र शहानवाजखानास आले होते की तुमची मर्जी कामाकाजाची व सलुख करावयाची अनेकाकडून होत्ये, हा भावार्थ काय आहे तो लिहिणे. उत्तर गेलें की जे होणें तें स्वामीचे विचार होईल. उपडाचे पैगाम येतात; परंतु जें होणे तें साहेबाचे सलाने होईल. इतक्यावर काय होईल तें न कळे. शहरांत बाजारअफवा की मोर्चे पाठवू ह्मणतात. परंतु हे गोष्ट होतां दिसत नाही. इतक्यावर भगवत् इच्छा न कळे. सैदलष्करखानाचा भाऊ दिल्लीहून सैद आरफखान आले आहेत. त्यास सैदलष्करखानाचा किताब जाला असे. हैदराबाजेचे कोतवालास खलात जाला. थोरले नवाब ऐशआराम व बागाची सईल करीत आहेत. वरकड कामकाज बसालतजंग करितात. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. राजश्री जानोजी निंबाळकर काल निजामअल्लीस भेटले. कळलें प॥. हे विज्ञापना. [ १११] ॥श्री॥ ६ आक्टोबर १७५७. पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय. सेवेसी भगवंतराव यादव स॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे:-- आज छ १९ मोहरमी संध्याकाळी पत्र बाबासाहेबाचे पत्रांत मलफुक