पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ उत्तर पद नोकर उनाने येथे सांगितले की आपण तरतुदीने येथें आलो. सहा सात हजार फौच व पांच हजार गाडदी नोकर ठेविले यामुळे दाहा पंधरा लाखा रुपयाखाले आलों. उत्तर प्रतिउत्तर प्रियभाषण बोलणियांत आले की आपण तों दाहापंधरालाख रुपयाखाले आलों ह्मणतात; परंतु आमचेमतें पन्नास लाख रुपये आपण मेळविले. जे येसमयीं आपलें येणें गोया करामात जाली. ऐसे समयोपयोगी बोललो. त्याउपर येक रकम शिरपेंच मुरसा आह्मास देऊन व सहित समागमीं अत्तर व पानदान देऊन रुखसत केलें. हवेलीस आलों. तुझास कळा ह्मणून लिहिले असे. हे विनंति. [ ११०] ॥ श्री॥ ६ आक्टोबर १७५७. पे॥ छ २१ मोहरम सूर्योदय. सेवेसी महिपतराव लक्षुमण सा॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे: येथील वर्तमान त॥ छ २० मोहरम बुधवार सायंकाळ जाणून स्वानंदलेखनास आज्ञा केली पाहिजे. विशेष. छ १८ रोजी निजामुदौला शाहमहमुदचे तकियांत गेले होते. तेथें खलबत केली की शहानवाजखानास लिहिणे. आमचे विद्यमाने येऊन मुलाजमत नवाबसाहेबाची करणे. तुमची तकसीर माफ करून जागिरा व मकान राहावयासी देवीत आहोत. किल्ला सोडून द्यावा. बरोबर वाजदअल्लीखान होते. मुरादखान व विठल सुंदर उभयतां राजश्री जानोजी निंबाळकर याजपाशी याचे मसलतीसाठी परवां पाठविले होते. खलेल करूं ह्मणत आहेत. परंतु बिसालतजंगाची मिजाज सरकारकामावर कायम आहे. तिळतुल्य अंतर दिसत नाही. दरमियानचे लोक निजामदौलाची मिजाज बाहरम करून फितवा करावयाचे विचारांत गडबड करीत आहेत. परंतु बिसालतजंगापुढे कारस्तानी चालेल ऐसा अर्थ नाही. निजामअल्लीसी बहुत सलुख करून मेळवून घेतले आहे. हैदरयारखानाचे