पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८७ पुढे निजामुदौलास बोलाविलें ह्मणोन शिबंदी ठेऊन आलो. त्यास खर्च जाहाला त्यास जागा नाही. याजकरितां बालाघाटचे माहाल जागीर करून घ्यावी ऐसा मनोदय आहे. पुढे काय होईल ते पाहावें. नवाब बसालतजंग निजामुदौलास मेजमानी करीत आहेत. हैदरयारखानाचे बागांत तयारी मेजमानीची. रोशनी व दारू वगैरे लवाजमा भक्षायाचा, वस्त्र, जवाहीर द्यावयासी पंचवीस तीस हजार रुपये तयारीस लागले आहेत. उद्यां अगर परवां बागांत नेतील. आजचे घडीपावतों बंधू बंधू स्नेहेंकरून आहेत. पुढे काय होईल तें विनंति लिहूं. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [१०९] ॥श्री॥ ६ आक्टोबर १७५७. पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय. राजश्री राजे जीवनरावजी गोसावी यांसी: दंडवत विनंति उपरिः-येथील वर्तमान तर छ १८ मोहरमी राजश्री विठ्ठलपंत दिवाण यांणी येऊन नवाब निजामदौला बहादर याचे मुलाजमतीचा मजकूर दरपेश केला. त्यासी उत्तर केले की बंदगानअल्लीच्या आज्ञेविरहित हे करणे नाही. त्यावरून त्यांणी गुलाम नक्षबंदखान यांसी सांगोन मुख्यास विनंति करून खानमजकुराचे हातची परवानगी आणविली. त्यासी आह्मी राजश्री विठलराव यांसी पाठवून गुलाम नक्षबंदरखान यासी सांगितले की मुख्याचे हातचे पत्र असावें, त्याविरहित आह्मी तिकडे जाणार नाही. त्यांणी नवाब बसालतजंगबहादर याचे हातचे आज्ञापत्र हासल करून पाठविले. त्यावरून छ १९ मिनहूस मंगळवारी राजश्री विठ्ठलपंत दिवाण संध्यासमयीं येऊन मुलाजमतीस घेऊन गेले. मुलाजमत जाली. ज्या ज्या प्रसंगोचित इस्तियाकमुस्ताह्या गोष्टी बोलावयाच्या त्या नवाब निजामदौला बहादूर यांणी बयान केल्या. तदोत्तर खिलवतांत गेले. तेथेंहि शिष्टाचारविस्तार व आपलें वर्तमान