पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ [१०८ ॥ श्री॥ ४ आक्टोबर १७५७, पे॥ छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस. सेवेसी महिपतराव लक्ष्मण स॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे. येथील वर्तमान त॥ छ १८ मोहरम सोमवार चार घटका रात्र पावेतों प्रताप स्वामीचा यथास्थित जाणोन स्वानंदलेखनास आज्ञा केली पाहिजे. विशेष. दरबारचें वर्तमान आज हैदरयारखान सेरजंग यांस पंचहजारी मनसब व झालरदार पालखी जाली. तसलिमात केली. पालखीत बसोन आपले हवेलींत शहरामध्ये दोन घटका दिवस राहतां आले. दरगाकुलीखान कालपासून आपले हवेलींत आले. आज दरबारास लष्करांत गेले नाही. उदईक जाणार आहेत. सैदकबीरखान पातशाही बक्षी यासी झालरदार पालखीची तसलिमात जाली. सरम तखानाचे पुत्रास व सुलतानखान जमातदार यास मातमीचें खलअत जालें. खोजे रहमतुलाखान पुसत होते की हकीम महमदअल्लीखान व तीर्थरूप राजश्री जीवनराव भेटले. इतके वर्तमान मात्र कळले. त्याजवर कांहीं वतमान गोष्ट मात जाली हे काही लिहिले आले आहे की काय ? उत्तर केलें जें वर्तमान आलें तें निवेदन केलें. पढ़ें येईल तें निवेदन करून. नवाब निजामुदवला तिसरे प्रहरा स्वार होऊन पैठणदरवाजाने शहरांतून नवाब सलाबतजंग याचे मातुश्रीपाशी गेले होते. तेथून शहामहमुदचे भेटीस गेले. परस्परें भाषण जाहले. मग आपले डेन्यास आले. वाजीदअल्लीखानाचा व विठ्ठल सुंदर याचा मनोदय की जो करारमदार बोली जाली आहे त्यांत निजामुदौलास मेळवून यश द्यावें. निजामुदौलाचे मनांत तो काही नाही. जे बसालतजंगानें केलें तें मान्य आहे. परंतु संगतीचे लोक खेळ करीत आहेत. इभ्राईमखान गाडद्यास लाख रुपये दरमहा करून नोकर ठेविले. त्यास येथे आल्यावर बंधूचे विचारें मनसुभा आहे की बारा लाख रुपये नगद कैसे अनकूल पडतील. याजपेक्षा जागीर द्यावी. राहील तरी ठेवावा. नाहीं तरी आज्ञा द्यावी. नांदेड तिही लाखांचे व माहूर तिही लाखांचे एकूण सा लाखांचे द्यावे. ऐशी चर्चा आहे. कबूल न करील तरी रुखसत करावे.