पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८५ हिरवे हवदियावर स्वार होऊन दोन अंबारिया जनानियाच्या व येक हत्ती निशाणाचा व स्वार शंभर वगैरे घेऊन निजामदवलाच्या डेरियास गेले. चार घटिका तेथे होते. वाजीदअल्लीखानाच्या भेटीच्या उद्देशे गेलो होतों तो नवाब सलाबतजंग त्याचे धणियाचे येथे गेले. त्याजकरितां भेटीचा योग न पडला. महमदगऊसखान हकिमजीचा आप्त. त्याण सांगितले की मी त्याचे कानावर घातले आहे. त्याचा समय मोठे पाहाटेचा आहे. त्यास पाहाटेच येणे. त्यास प्रातःकाळीच जाऊ. भेटीनंतर सेवेसी लिहितों. सर्व वर्तमान बाबासाहेबास सांगोन सेवेसी लिहितों. याजपैकी उत्तम जाणावें. तें हकिमजीस इतकी इतला यावी. मजला त्यासी गरज नाही. महाराजाचा आज्ञांकित आहे. त्यांहीं महाराजादेखतां सांगितले की मजलाहि इतला होय. याजकरितां विज्ञापना केली असे. सारांश स्वामींहीं यश थोर संपादिले ह्मणून कितेकांस असह्य जालें आहे. परंतु ईश्वरसत्तेनें तेच पराभवातें पावतील. चिंता नाही. महाराज स्वामिकार्यावर एकनिष्ठ आहेत. हे नियत पूर्ण यशच आहे. पत्र लिहिलियावर खोजे रहिमतुलाखान बहादूर यांचे येथे गेलो होतो; पुसू लागले की काय वर्तमान. उत्तर दिले की खैरियत आहे. राजाजीची आज्ञा की प्रतिदिनी दर्शन घ्यावे. जो ईरश्याप होईल तो अवधूतरावजीस इतला देऊ. राजाजीस ल्याहावें. त्यांहीं उत्तर दिले की राजाजीस लिहिणे की कोणे गोष्टीने वसवसा न कीजे. चर्चा ज्या ऐकत असाल त्याचा इतबार न कीजे. नवाब बसालतजंग डेरियांतून आपले हवेलींत आले आहेत. मागती जातील. फतहुदीअल्लीखानजीची भेटी जाली. त्यांहीं पत्र हकीममहमदअल्लीखानजीस पारसी लिहिले आहे ते पाठविले आहे. त्यास पावतें करावें. जबानीं मजला फतहुदीअल्लीखानजी ह्मणों लागले की हकिमजीचें येक काम तो जालें. दुसरे परगणियाचे पुसिलें त्यास उत्तर खुलासियाचे खोजे रहिमतुलाखान बहादूर यांहीं दिधलें नाही. मागती पुसोन लेहं ऐसें हकिमजीस सांगावें. जर आज्ञा होईल तर त्याचे कार्याचे पत्र पारसी त्यास वेगळे लिहीत जाऊं. महाराजाचे हस्तें पावतें होईल. याविशीं जैशी आज्ञा. अर्जी भगवंतराव यादव. २४