पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ कोर मिळाली तर त्यांत त्याची आर्थी आह्मासी वाटून खावी; त्यास स्मरण असेल की नाही. राजकी वर्तमान तो जोवर निजामदवला शहरी पावले नव्हते तोंवर याचे कारभारी आमासी साफ गोष्टी सांगत होते की नवाब निजामदवलाचा हेत की शहरांत गेलियावर श्रीमंताकडील दारमदार जाला तोच सिद्धीतें पावावा व त्याचे यश घ्यावं. येथें आलियावर आमासी विचार चोरीत आहेत. खुलासा कळों देत नाहीत. बाह्यात्कारें तों नरमत्व रक्षितात; परंतु अंतर साफ दिसत नाही. ह्मणून आह्मीहि आपणास वाढून चढविले आहेत. फार लागले जात नाहीत. शेवटी कुंभाराची सून उकरडियावर येईल एसें बालले. दुर्गाचं पुढिले ह्मणों लागले की अजून कांहीं सैनिक तेथे पाठवावें ऐसें नाहीं. ऐसें जालें तरी दारमदार कोठे राहिला ? हे करणार नाहीत हे त्याचे जबानीचें वर्तमान. यानंतर काल चार घटिका दिवस राहतां राजश्री वासुदेव दिक्षीत सातारकर माहाराज अर्जुनबहादर जानोजी जसवंत निंबाळकर याचे येथे आले होते. उभतांचा एकांत जाला. त्याजउपरि विठोजी सुंदर व मुरादखान ऐसे गेले होते. कांहीं का. गदहि घेऊन गेले होते. एकांती याचे व त्याचे बोलणें जालें. ते उठोन गेलियावर शामजीपंत टकले मये लक्ष्मणपंत गेले होते. यास भेटी पाने देऊन रुकसत केले. हें वर्तमान आजी सेवकास कळलें. सेवक बाबासमागमें रात्री याचे येथे गेलो होतो. तेव्हां न कळे. महाराजाचेहि पत्र त्यास तेच वेळेस आलें तें बाबासाहेबांदेखतां महीपतराऊजीने वाचन दाखविल. शामजीपंताने दरहिकायत हेहि बोलले की निजामदवला जातीनसी साफ आहे. परंतु येकदाघेजण बुद्धीचे भ्रवशक आहेत ते उगेच शिगुसे करावयाच्या विचारांत आहेत; परंतु शेवट होणार नाही. आह्मी तों उत्तर देऊन चुकलों की श्रीमंतास बिघाड करून यश नेणार नाहीत. तुमचे वडिली व नासरजंगाही इतकें केलें. शेवटी देऊनच सलुख केला. ऐसे आह्मी बोललो. ऐसे दरहिकायत शामजीपंताहीं मजपाशी सांगितले. कळावें. ह्मणोन लिहिले असे. आजी छ १२ दीड प्रहर दिवस चढलिया बंदगान अल्ली,