पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८३ [१०७] ॥श्री॥ ५ आक्टोबर १७५७: पे॥ छ १९ मोहरम मंगळवार सा घटका रात्र उर्वरित. सेवेसी विज्ञापना ऐसीजे. काल छ १८ मोहरमी दीडप्रहर रात्री पत्र बाबासाहेबी डाकेचे जासुदाब॥ पाठविलें त्याजवरोन अवगत जालें असेल. छ १९ मंगळवारी प्रात:काळी शोध केला तो लोक आले की काल निजामुदौला बहादुर आसफजंग तकियांत गेले होते. यापूर्वी विठोजी सुंदरहि तकियांतून होऊन आले. मग निजामुदौला गेले. जेव्हां तकियांत गेले तेव्हां शहामहमुदजी मशीदीत निमाज पढावयास गेले होते. निजामुदवला शाहामुसाफर याचे दरगांत जाऊन जीयारत केली. मग शाहासाहेब निमाज पढलिगावर ऊजरियांत जेथें बसतात तेथे घेऊन गेले. वजीदअल्लीखानहि समागमें होते. गोष्टी मातंत तों चरपरेपण दिसोन आले. शेवटी गोष्टी शाहानवाजखानाची दरमियान आली. त्यास शाहजीहि बोलले की तो सैद आहे. आणि दाना व शिंदवी आहे. रहम त्याचे बाकांत जरूर आहे. वाजीदअल्लीखान नाही. लुकमा दिधला की जे आपण ह्मणतात तें सत्य आहे. त्यास शाहानवाजखानास पत्रे कांहीं वाजीदअल्लीखानाची गेली आहेत. शाहजीही निजामुदवलास पागोटें १ व कमान १ व तरवार येक ईनायत केली. अत्तर वगैरे दिधलें. हें वर्तमान शाहाजीकडील असे. दुसरे, रा॥ लक्ष्मणंपत टकले याची भेट जाली. त्याजकडून कळों आले की शामजीपंत निजामुदौलास रुकसत मागत होते की साहेबजादे हुल्या एकवल यांचे भेटीस जाऊं. मग वराडांत जाऊं अगर जे आज्ञा करितील तें करूं. त्याचे उतर शामजीपंतास दिधलें की आह्मीच चालणार वराडांत. च॥ जाऊ या. तुहास रुकसत करूं. दोन रोज ठेविले आहे. शामजीपंत राहत नाहीत. निजामवल्याचे सैन्यांत डेरा देऊन राहिले आहेत. आपण बाबासाहेबांस पुसोन सैन्यांत त्याचे भेटीस गेलो होतो. भेटी जाली. बहुत स्नेहांत माहाराजाचे दाखवून खुलासा पुसला. त्यास शामजीपंत ह्मणों लागले की राजाजीचा आमचा स्नेह पूर्व आहे. आमी येथवर उमेद देवितों. चत