पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ तें सेवेसी लिहिले असे. फतहदी अल्लीखान निजेले सांगोन पाठविले की पाहाटे बाहेर थेणे. त्यास प्रातःकाळी जाऊन त्याची भेटी घेऊन शाहाजीचे येथील व आणखी वर्तमान शोध करून इतला देतो. हे विज्ञापना. छ १८ दीडप्रहर रात्र. [१०६] श्रीदत्तात्रय॥ ५आक्टोबर १७५७. श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी:विनंति आज्ञाधारक अवधूतराव केशव स॥ नमस्कार विज्ञापना त॥ छ १८ मोहरम सोमवार प्रहर रात्र सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. छ १७ तेरखे आज्ञापत्र सादर जाहलें तें आज तिसरे प्रहरी पावले. त्यांत आज्ञा सादर जाहली की बारीक मोठे वर्तमान लिहीत जाणे. आज्ञेप्रमाणं आलाहिदा सेवेसी लिहिले आहे त्यावरून श्रुत होईल. आणखी शहरचे लोक बारीक मोठे वर्तमान लिहितात त्यास स्वामीचे प्रतापें त्या सर्व गोष्टी मिथ्या असेत. आज रात्रीं आतांच खोजे रहिमतुलाखानांनी मजला बोलाऊन नेऊन सांगितले की लोक इभराईमखान गाडदी व लक्ष्मण खंडागळे वगैरे लबाडीत फिरतात; परंतु त्यांच्याने काही कोणाच्याने होणें नाहीं; आपले घरी लबाडी बोलतात त्यास मनाई का करावी ? त्याहींमध्ये या शहरचा अलम येक येक प्रकारचा आहे. आह्मीं जो श्रीमंताच सेवेंत करारमदार केला आहे त्याप्रमाणे राजे जीवनराव यास ल्याहावें की श्रीमंतास विनंतिअर्ज करून सत्वर निर्गमांत आणावा. येणेप्रमाणे सांगितले ते सेवेसी विनतिअर्ज केली. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.THERALL सार्वजाने खेड,