पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८१ आतां गाडदी ह्मणतो की शागीर्दपेशाचे तों इनाम आहे; माझे तलत मजुरा न घेणे. ऐसा बखेडा आहे. खोजे रहिमतुलाखान याचे लेकीस बरें वाटत नाही ह्मणून तिसरा प्रहरी सैन्यांतून शहरास घरी जात असतात. बाबासाहेब आज छ १८ रात्री स्वार होऊन सैन्यांत त्याचे घरी गेले होते. ते डेरियांत नव्हते. मग माहाराज अपूर्ण बहादूर जानोजी जसवंत निंबाळकर याचेथे गेले होते. सेवकहि समागमें होता. त्याजउपर शहरांत आलियावर महाराय वकिलाचे घरास गेला. त्याचे वर्तमान ध्यानास आणून पुढे खोजे रहिमतुलाखान बहादूर याचे घरी रात्री गेलों तो घरांतून बाहेर निघोन सैन्यांत डेरियास जात होते ते आपण जाऊन बाबासाहेबाचे तर्फे त्याचे लेकीचे खैरयतीचें वर्तमान पुशिलं आहे. आणि नकाहत ? असतां आपले भेटीस्तव सैन्यांत गेले होते. आपण घरी आले ह्मणून भेटी न जाली. मजला खितमतींत पाठविले आहे. राजाजीहि पत्र आले. हकीमजीस साहेबजादियाचे मुलाजमतीचें बाहरमद केलें. वितिपात जालियावर भाषण होईल. मग ईतला दिधली जाईल. ऐसें अवधूतरावजीस लिहिले आहे. आजी हजरतेस बहुत बहुत स्तवीत आहेत. आणि लिहिले आहेत की रोयेदाद जरूरी असेल ते हजरतेस पुसोन लिहीत जाणे. आजी त्याचा खुलासा काढावयास हे गोष्टी बोललों की हजरत खातरजमा ठेवीत. साहेबजादियापाशी व श्रीमंत पंतप्रधान साहेबापाशी हजरेत वा स्तव फार केला आहे. कोण्ही मुखालीफ हरदाज कसील इभराईमखान वगैरे कलि तरी त्याचे पारपत्यें बरें हाईल. मग ह्मणों लागले की राजाजीस लिहिणे की कोण्ही बरदाज नाही. खातरजमा ठेविजे. मुजफरखान गाडदी यास चौ घाटकांत काढून दिधलें. त्याजपुढें इभराईमखान काय काळ आहे ? ऐशा गोष्टी बहुत मजबूदीने खुश होऊन सांगितल्या. हयदरजंग राजबंदरीस पावले. हे सर्व वर्तमान बाबासाहेबास इतला देऊन त्याचे आज्ञेप्रमाणे सेवेसी लिहिले असे. आजी तोफांचे आवाज दहा वीस केले. लोक बोलत होते की लेक जालियाचे खुसीचे किंवा मलमुर होय ह्मणून याचा संशय काही नाही. परंतु जे आढळले