पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ [ १०४] ॥ श्री॥ ४ आक्टोबर १७५७. पे॥ छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस. महीपतराव लक्ष्मण सेवेसी विज्ञापना ऐसीजेः- परवाचे दिवशी नवाबास मोहोरकबंदी द्यावयासी राजश्री जानोजी निंबाळकर आले होते. मुबारकबादी दऊन नवाब बमालतजंगाचे डेन्यांत येऊन बसले. तेथे उभयतांसी भाषण जाहलें की नवाबास दौलताबादेस शहानवाजखानापाशी पावतें करावें, हा आळा निबाळकरास आला होता त्याचा परिहार जाला. नवाब बसालतजंगास कळले की यांजपासून ही गोष्ट सहसा होणार नाही. तेव्हां नबाबांहीं गळ्यांत हात घालून पोटासी धरले. तुह्मापासून उमेद मोठीसी आहे. चित्तांत किलमिष होता तो दूर केला असे. सेवेसी श्रुत होय. वेदमुहूर्ती दीक्षित महाराव जानोजीचे घरास आले होते, साता-यास उपद्रव फार लागला आहे. आझी जावें की राहावें ! महारावजीने समाधान केले की तुझास काय चिंता आहे. समाधानें राहाणे. आज सायंकाळी मुरादखान व विठ्ठल सुंदर महारावजीपाशी येऊन मसलत एकांती करीत बसले होते. महारावजीकडील विठलरावहि होते. चौघेजण चार घटकापर्यंत दिवाणखान्यापुढे बाग आहे. तेथे बसोन एकांत केला. मनास परस्पर आणिता निजामअल्लीस महाराव अद्यापि भेटले नाहीत. भेट घ्यावी ह्मणत होते. उत्तर महारावर्जीने केले की आमांस भेटीवाचून काय प्रयोजन ? त्याचे भावासी भेटलों, ते त्यासीच भेटलो. तें व हे एकच आहेत. हरयेकापाशी राहोन नोकरी करावी. बहुतेक भेटीस उद्या परवा जातील. राजश्री वेंकटराव निंबाळकरहि भेटले नाही. याची जाल्यावर त्याची होईल. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनति. GENERAL सार्वजालेक वाचन खेड, (यु.)