पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ ॥श्री॥ ५ अक्टोबर १७५७ पे॥ छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस. सेवेसी भगवंतराव यादव दी।। अवधूतराव केशव स॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे:-कालचें वर्तमान श्रीमंत बाबासाहेबाचे पत्रांत लिहिले त्याजवरून अवगत जालें असेल. आज छ १८ मोहरमी खोजे रहमतुलाखान बहादूर यांचे येथे गेलों होतो. पुतूं लागले की कांहीं राजियाकडील पत्र आले की काय ? आपण उत्तर जवळ जाऊन दिल्हे की काल हकीम महमदअल्लीखानजीचे भेटीचें वर्तमान राजाजीचे पत्रावरून श्रुत केले. त्याजउपर आज पत्रे आलियावर निवेदन कले जाईल. मग फतहुदीअल्लीखान याची भेट घेतली. हे ह्मणों लागले की विशेष काही नाही. मागती भेटणे. पुरता शोध घेऊन सांगणे. त्याचे घरीं जाऊन जे सांगेल तें लेहून पाठवितों. हकीमजीही पत्र फतहुदीअल्लीखानजीस आपले इनामाचे गांवाविषयी व परंडियाचे जाहगिरीविषयी लिहिले होते. त्यास परवानगी इनामाचे गांवची व परंडियाचे जागिरीची एसे कागद दान खोजे रहिमतलाखानबहादर यांहीं लालामहाराय वकील याचे हवाला केलें ऐसें हकीमजीस सांगणे. आज छ १८ सोमवारी दरबार जाला. हैदरयारखान सेरजंग यास पंचहजारीची तसलिमात जाली. पालखा झालदार इनायत जाली. सयद कबीरखान बक्षी पातशाही यास झालदार पालखाचा तसलिमात जाली. इजाफा पंचहजारीचा होणार. सफसीलानखान उभयता अबदुल हुसैनखान ह्यदराबादेची सुभेदारी कुल इजारा केली. त्याजकड रु॥ लाखो सरकारचे आहेत. त्याजकरितां अबदुल हुसेनखान सफसीलानखानाचा पुत्र येथे आहे त्याजवर तगादा ह्मणोन त्याणं जे जे अमील सफसीलानखानाचे अमलचे होते त्यांची इसमनवेशी लेहून दिल्ही. बहादरसिंग ब-हाणपूरकर अमील त्याचे वेळेस होता. त्यास पंनास गाडदी पाठवून बेहुरकत करून नेले. कळावें. आंज छ १८ नवाब निजामुद्दवला बहादर आसफजग स्वार होऊन शहरास आले होते. बादली निमे अस्तीन ल्याले