पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मान त॥ छ १६ मोहरम मंदवार दोन प्रहर स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. यानंतर येथील वर्तमान तर नवल विशेष लिहिजेसें नाहीं. नवाब सलाबतजंग यास पुत्र जाहला आहे. त्याचे मुबारकबादीस त्याचे दर्शनास नवाब निजामुदौला गेले आहेत. सायंकाळी आपले डेरियास येतील. दौलताबादेस मागती चौक्या पाठविणार ह्मणोन येक दोघे बोलत होते; परंतु केवळ प्रमाणांत नाही. तथ्य असिल्यास सविस्तर मनास आणून विनंतिपत्री लिहिले जाईल. सेवेसी विदित होय. हे विनंति. Plemmamimicheleas [१०३] ॥श्री॥ २ आक्टोबर १७५७. पे॥ छ १७ मोहरम रविवार प्रहर दिवस बाकीचा. श्रीमंत सद्गणमूर्ती राजश्री रावसाहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक दी॥ नारायणराव वकील श्रीमंत स॥ नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १७ मोहरम प्रातःकाळ आपले कृपेकरून कुशल. यानंतर हैदराबादेकडील वर्तमान. मुजफरखान गाडदी याणे गडबड मांडिली आहे. एक ठिकाण गडबड करून घ्यावें ऐसा त्याचा मनोदय. हे वर्तमान मुख्यास येथे आले. हे पुढे तदबीर काय करितात हे लिहिले जाईल. ईभ्रामखान गाडदी याचे देवडीवर गुणाजी नाईक दोन माणसें हरकार ठेऊन आपण हजर राहत आहे. लौकिक बोलवा आहे की गाडदी याचे पोटामध्ये खोटाई आहे. मुख्यापासून आज पावेतों दुसरी गोष्ट निघाली नाही. पुढें जें वर्तमान होईल तें विनंति केली जाईल. पूर्वी पांच सा पत्रे सविस्तर सेवेसी विनंतिपत्र लिहिली सेवेसी पावली असतील; परंतु उत्तर येक सादर न जालें. याकरितां सेवकाचे पत्र सेवेसी कोण्ही पोहचावितो की नाही हेहि कळत नाही. आतां कृपा करून उत्तर सादर केले पाहिजे. i ngharu हे विनंति. २३