पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥श्री॥ १ आक्टोबर १७५७ पे॥ छ १६ मोहरम मंदवार प्रहररात्र. श्रीमंत सद्गुणमूर्ती राजश्री रावसाहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक दी। नारायणराव आपाजी वकील श्रीमंत सा॥ नमस्कार विनात उपरि येथील क्षेम ता॥ छ १६ मोहरम मंदवार श्रीमंताचे कृपेकरून कुशल. छ १६ रोजी सलाबतजंग दरगाकुलीखानाचे बागामध्ये सयरेबदल तिसरा प्रहरा गेले. ब॥ पंनास माणूस, पंचवीस स्वार होते. त्याउपरि अलजपुरचा अधिकारी व बसालतजंग येकत्र होऊन निजामअल्लीचे सेरियांत तिसरा प्रहरा खलबत केले. त्यास निजामअल्लीने आपलें वर्तमान मार्गीचें सीपाहचे देण्याचें कुल श्रुत केलें. यांणी आपले येथील व राजकी किल्याचे व श्रीमंताचे स्नेहाचा विस्तार कुल जाहीर केला. त्यास ज्येष्ठांनी उत्तर दिधलें की आमचे विस्ताराचा तुह्मी निर्वाह करणे अगर तुह्मांस आपले ताबेदारीमध्ये ठेवणे आहे तर आह्मी तुमचे विस्तारावेगळे नाही. तुझांस अनकूल येत नाही तरी आमचे सलाहप्रमाणे तुझी चालावें. ऐशी परस्परें भाषणे जाली. बसालतजंगांनी उत्तर केले की सलाबतजंगास श्रुत केलिया त्याचे विचारें में मुकरर होईल त्याप्रमाणे आपण उभयतां वर्तणूक करावी. र॥ विठोपंत दिवाण निजामअल्ली छ १५ रोजी सायंकाळी शहरास दाखल जाले. पत्र प्रहरा दिवसा रवाना जाले. सायंकाळ पावेतों वर्तमान में कांहीं लहान मोठे येईल तें सेवेसी विनंतिपत्र लिहीले जाईल. बहुत काय लिहिणे, हे विज्ञप्ति. [१०२] ॥श्री॥ १ आक्टोबर १७५७. पे॥ छ १६ मोहरम प्रहर रात्र मंदवार. सेवेसी विनंति सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति येथील वर्त