पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७५ दिल्लीहून कूच करून अकबरपूर पावेतों गेले आहेत. दोन पातशहीजादे समागमें घेतले आहेत. लाहोरीहून पठाणहि बाहेर निघाला आहे. दिल्लीकडे येतो वार्ता असे. लाहोरचा सुभा श्रीमंतांस दिधला असे. वरकड मुलकांतील पैसा निमेनिम वाटून घ्यावा. पातशहास दरमहा बांधला आहे तो निमेनिम देत जावा. इतक्यावर जें वर्तमान होईल तें विनंति लिहून. येथील दरबारचे वर्तमान छ १६ रोजी नवाबास कन्या जाहाली. ह्मणोन प्रातःकालीं बिसालतजंग व तमाम अमिरांनी नजरा केल्या. राजश्री जानोजी निंबाळकरहि आले होते. तेथून बिसालतजंगाचे डेन्यांत जानोजी महाराऊ आले. च्यार घटका बसले होते. दोन प्रहरा निजामुदौला ताशाचा पोशाक करून मुबारकबादीस आले. नजर केली. दोन घटका बसून मग बिसालतजंगाचे डे-यास आले. तेथें एक प्रहर बसून खिलवत केली. मग तीन रकम जवाहीर व नव पारचे नजर केले. नवाबांनी आपली स्वारी बागांत जायासी तयार करविली होती. तेथून परस्परें निजामदौलाचे डेन्यास जाणार होते. हा काळवर तिघे बंधू समाधानेकरून आहेत. नवाबास निजामदौला ह्मणों लागले की तुह्मीं आमांस आसफजाचे ठायीं आहांत. लोकांनी नाहक तुमचे मनांत वसवास घातला असे. मनांत कृत्रिम असेल तर कुराणावर हात ठेविला. तेव्हां नवाबांहीं उत्तर केले की दौलत सलतनत अवधी तुमची आहे. ऐशी परस्परें स्नेहाची भाषणे करून येवेळेपावेतों समाधाने आहेत. उदईक जें वर्तमान होईल तें लिहून. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ छ १७ मोहरम, रविवार, अडीच प्रहर दिवस चढता. १६९ अल्लीगोहर आणि जवानवख्त हे दोघे असावे. १७० लिहूं. पुष्कळ मराठी पत्रांत आणि विशेषतः कोकणांतून वर आलेल्या लोकांच्या पत्रांतून अनुस्वाराचे ठिकाणी निराळा सबंद न लिहावयाची गेल्या शतकांत चाल होती असे दिसतें (पहा पत्रे व यादी १५८, १८४, १६६). १७१ भरजरीचा. १७२ आनदप्रदर्शनार्थ. १७३ वस्त्रे. निजामुन्मुल्काचे