पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १५ मोहरम श्रीमंताचे कृपेकरून कुशल स्वकीय लेखकास आज्ञा केली प॥. विशेष. छ १४ रोजी दोनप्रहर चार घडी दिवसा निजामअल्ली येऊन नवाब सलाबतजंग वगैरे कुल अमीर गेले होते. निजामअल्लीनी नजर पाच मोहरा, रुपये ११ सलाबतजंगास गुजाराणिल्या. हें वर्तमान छ १४ चे पत्राब॥ सविस्तर रवाना केलें आहे. विदित जालें असेल. छ मजकुरी दरबार केला. बसालतजंग वगैरे लोक आले. चार घटका खलबत केलें. दरबार बरखास्त झाला. त्याउपरि बसालतजंग निजामअल्लीचे डेरियास आले. तेथें इभ्रामखान गाडदी, लक्षमणराव खंडागळे, खोजे रहीमतुलाखान मिलोन खलबत केले. गाडदी वगैरे यांनी विस्तारहि दिधला की चार कोस श्रीमंतजीकडे दबाव टाकावा. कांहीं किल्याकडेहि रूख दाखवावा. हें वर्तमान येका मातबराचे जबानीं आलें. सेवेसी विनंति केली. उदईक तहकीक करून लिहिले जाईल. गुणाजी हरकारे सरकार यांणींहि या मजकुराची बातमी आणिली. लहान मोठे वर्तमान सेवसी वरचेवर लिहील. बहत काय लिहिणे. हे विनंति. [ १०.] श्रीदत्तात्रय १ आक्टोबर १७५७. अवधूतराव केशव.. अर्ज. विज्ञापना ऐसीजे. हिंदुस्थानाकडील वर्तमान आले की गाजुद्दीखान वजिरांहीं श्रीमंत राजश्री दादासाहेबासी मलूक करून उभयतां एकचित्त होऊन नजीबखान रोहिला जेर केला. तेव्हां येऊन भेटला असे. वजिरांहीं बंगाल्यांतील पैका आणिला होता. पातशहाचे खजान्यांत एक करोड बत्तीस लाख रुपये दाखल केले. पुढे आतां मोहीम लाहोरावर श्रीमंत व वजीर करीत आहेत. पंधरा हजार स्वार अंताजी माणकेश्वर याजबरोबर देऊन तमाम ठाणी पठाणांची उठ वन आपली बसवीत आहेत.