पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. धर्म, नीति, विद्या, राजकारण इत्यादि राष्ट्राच्या चरित्राची जी निरनिराळी अंगें सांगितली त्यांचा विचार दोन त-हेनें करितां येईल. ही अंगें कार्याच्या रूपाने फलित झालेली पाहून त्या फलित रूपांचें पद्धतवार वर्णन करण्याची एक तन्हा आहे व हीच अंगें कारणरूपाने असलेली पहाणे ह्मणजे वर सांगितलेल्या फलित कार्याची कारणे ह्मणन त्यांचा विचार करणे ह्मणजेच दुसऱ्या त-हेचा अंगीकार करणे होय. पहिल्या त-हेला मी भौतिक ह्मणतों व दुसरीला आत्मिक ह्मणतों. भौतिक पद्धतीने कोणत्याही धर्माचा विचार करावयाचा ह्मणजे त्या धर्मातील निरनिराळ्या पथांचे जीवनवृत्तांत द्यावयाचे ह्मणजे ते पंथ किती आहेत, त्यांची स्थलांतरें कोठे कोठे झाली, निरनिराळ्या पथांच्या कलहांचे स्वरुप काय होतें इत्यादि बाह्य रूपांची वर्णने करावयाची आणि आत्मिक पद्धतीने कोणत्याही धर्माचा विचार करावयाचा ह्मणजे त्या धर्माची मूलतत्वे काय आहेत, आत्म्याच्या अनेक वृत्तीतून कोणत्या वृत्तीचें त्या धर्मात प्राधान्य आह, इत्यादि अंतःस्थ ध गूढ प्रश्नांचा उहापोह करावयाचा. भौतिक पद्धतीने कलाकौशल्याचा विचार करावयाचा मगजे त्याच्या शाखा किती आहेत, निरनिराळ्या शाखांचा संकर किती झाला व शाखांची स्थलांतरें कोठें कोठे झाली हे सांगावयाचे आणि आत्मिकरीत्या कलाकौशल्याचा विचार करावयाचा ह्मणजे आत्म्याच्या कोणत्या वृत्तीपासून कलाकौशल्याचा उगम होतो वगैरे अंतःस्थ व गूढ प्रश्नांचा उलगडा करावयाचा. त्याचप्रमाणे भौतिक पद्धतीने कोणत्याही राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा विचार करावयाचा ह्मणजे त्या राांत झालेल्या अंतःस्थ कलहांची व बहिःस्थ कलहांची वर्णने द्यावयाची ह्मणजे राष्ट्रांताल बंडांची, निरनिराळ्या पक्षांच्या, वर्गाच्या व जातींच्या चढाओढींची व परराष्ट्रांशी झालेल्या लढायांची वर्णने द्यावयाची आणि आत्मिक पद्धतान राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा विचार करावयाचा ह्मणजे अंतःस्थ व बहिःस्थ कलहांच्या उत्पत्तीची कारणे, त्या राष्ट्रांतील एकंदर लोकसमूहांत आत्म्याच्या उन्नतावनत वृत्तींपैकी कोणत्या वृत्तीचे विशेष प्रावल्य आहे त्याचा सूक्ष्म विचार, त्या राष्ट्रांतील मोठमोठ्या तटांच्या पुरुषांच्या राजकीय मताचें सशास्त्रदर्शन इत्यादि प्रश्नांची चर्चा करावयाची. राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा भौतिक व आत्मिकदृष्टया जो विचार त्यासच राष्ट्राचा राजकीय इतिहास ह्मणतात. धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, रुषि, कलाकौशल्य । ह्यांतील एक किंवा अनेक अंगांचं प्राबल्य किंवा दौर्बल्य होऊन राष्ट्राच्या राजकीय चरिनावर त्यांचे आघात व परिणाम होऊ लागले ह्मणजे त्यांचाही विचार राष्ट्राच्या राजकीय इतिहासांत करावा लागतो. येणेप्रमाणे कोणत्याही राष्ट्राचा सर्वांगांनी संपूर्ण असा राजकीय इतिहास लिहावयाचा झटला ह्मणज तो भौतिक व आत्मिक अशा दोन्ही पानी लिहिला पाहिजे. आतां प्रस्तुतच्या विवेचनाचा विषय जो ग्रांटडफचा इतिहास त्याची पद्धत पाहिली तर निव्वळ भौतिक आहे हे सर्वत्र ग्राह्य होण्यासारिखें आहे असे वाटते. आत्मिकरीत्या मराठ्यांच्या इतिहासाचा विचार करण्याच्या खटपटींत पडण्याची आपली इच्छा नाही व याग्य शिक्षण न मिळाल्यामुळे आपल्या अंगी सामर्थ्य नाही असें ग्रांडफ आपल्या