पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना बरी केली आहे; परंतु, खुद्द लढाईचे वर्णन मुळीच दिलेले नाही. पानिपत, उदगीर व शिंदखेड ह्या तीन मोहिमांखेरीज नामसंकीर्तनापलीकडे ग्रँट्डफ्नें कोणत्याच मोहिमेचें वर्णन केले नाही. अमक्या वर्षी अमुक मोहिम झाली व तीत अमुक अमुक व्यक्तींचा प्रमुखपणे संबंध येतो ह्या व्यतिरिक्त त्याच्या ग्रंथांत जास्त काहीएक सांपडावयाचें नाहीं. हा असा प्रकार होणे एका प्रकारें अपरिहार्यच होते. १७५० पासून १७६० पर्यंत ठळक ठळक अशा बेचाळीस मोहिमा झाल्या हे वरती सांगितलेच आहे. ह्या प्रत्येकीचें यथास्थित वर्णन देऊं ह्मटल्यास ग्रांटडच्या बखरी एवढी वखरही पुरणार नाही. ह्याचा दाखला पाहिजे असल्यास ग्रांटडफ्ने केलेले पाणिपतच्या लढाईचे वर्णन घ्या. ग्रांटडफ्च्या इतिहासाचा संबंध २१वा भाग ह्मणजे ग्रांटडफ्च्या मुंबईच्या आवृत्तीची १५ पृष्ठे ह्या मोहिमेनें व्यापून गेली आहेत. लहान मोठ्या मोहिमांची सरासरी काढून दर मोहिमेस १० पृष्ठे धरिली तर ४२ मोहिमांस ४२० पृष्ठं लागतात. तेव्हां १७५० पासून १७६१ पर्यंतच्या मराठ्यांच्या हालचालींचा वृत्तांत मुंबई-आवृत्तीच्या५० पृष्ठांत आणावयाला बऱ्याच मोहिमा न कळत गळाल्या असतांहि राहिलेल्या मोहिमांची त्रोटकच हकीकत देणे ग्रांटडफ्ला भाग पडले. तशांत, मरा. ट्यांच्या हालचाली एकाच विवक्षित प्रदेशांत होत नसून, एकाच काली, स्वदेश, कोंकणकिनारा, गजराथ, खानदेश, त्या वेळचें निजामाचें राज्य,ह्मैसूर, रजपुताना, दिल्ली, अंतरवेद, नागपूर, अयोध्या, काशी, प्रयाग, बुंदेलखंड इत्यादि निरनिराळ्या प्रांतांत होत असत. त्यामुळे दृष्टि फांकून जाऊन, दरवर्षी एकाच मोसमांत होणाऱ्या निरनिराळ्या मोहिमांचे व्यवस्थित आकलन होऊन वर्णन करितां येण्याचे काम केव्हांहि मोठ्या श्रमाचें व कुशलतेचें होण्याचा संभव आहे. तशांत त्याच्या हातून, मिळालेल्या कागदपत्रांचा व्हावा तसा उपयोग झाला नाही. त्या व इतर कारणांनी ग्रांटडपच्या हातून जशी इमारत मराठ्यांच्या इतिहासाची मराठ्यांच्या दृष्टीने उठावी तशी उठली नाही. ह्याला मुख्य कारण ग्रांटडफ्नै स्वीकारलेली पद्धत किंवा खरें मटले असतां पद्धतीचा अभाव होय. अर्थात् १७५० पासून १७६१ पर्यंत बाळाजी बाजीरावाने जो अवाढव्य खटाटोप केला त्याचे ग्रांटडच्या संक्षिप्त पद्धतीनें यथास्थित वर्णन होणे अगदीच अशक्य होते. ह्या ग्रांटडपच्या संक्षिप्त पद्धतीचे स्वरूप पुढील विवेचनांत स्पष्ट करून दाखवितों. विवेचन पहिले. कोणत्याहि संस्कृत राष्ट्राच्या चरित्राचा सांगोपांग विचार करावयाचा झटला ह्मणजे तो अनेक दृष्टींनी केला पाहिजे. धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, कृषि, कलाकौशल्य, कायदेकानू, राजकारण व तत्सिद्धयर्थ केलेल्या अंतःस्थ व बहिःस्थ खटपटी इतक्या सर्वांच्या प्रगतीचा किंवा विगतीचा कालक्रमाने यथास्थित, बांधेसूत, पद्धतवार व सप्रामाण विचार केला जाऊन तो पुनः आत्मिक व भौतिक रीत्या झाला ह्मणजे राष्ट्राचे चरित्र समग्र कळले, असे होते. येथें आत्मिक व भौतिक हे शब्द कोणत्या अर्थाचे वाचक आहेत तें सांगितले