पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७३ १९७] ॥श्री॥ ३० सप्टेंबर १७५७. पे॥ छ १५ मोहरम शुक्रवार दीड प्रहररात्रउर्वरित. सेवेसी विनंति. सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ छ १५ मोहरम शुक्रवार तिसराप्रहर स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. यानंतर आज प्रातःकाळी विनंतिपत्र पाठविलें आहे तें पावलेंच असेल. दोन प्रहरा नवाब बसालतजंग नवाब निजामुदौलायाचे डेरियास येऊन येक प्रहर उभयतां खिलवतेत बसोन परस्परें सभाई होऊन आणशफत जाहाली ह्मणोन येक गृहस्थाचे द्वारें शोध लागला, त्यावरून विनंति लिहिली असे. राजश्री विठोजी सुंदर दिवाण बाळापुरी राजश्री येशवंतराव कानेरे व कृष्णाजी गोविंद यापासीं ऐवज आणावयाबद्दल राहिले होते, त्यास तूर्त दीड लाख रुपयाचा निकाल करून घेऊन आले. छ म॥री लष्करांत दाखल जाहले. विदित होय. हे विनंति. ९८ । ॥ श्री॥ पे॥ छ १५ मोहरम शुक्रवार दीडप्रहर रात्र उर्वरित. श्रीमंत सद्गुणमूर्ती राजश्री राऊसाहेबाचे खिजमतीसः - आज्ञाधारक गुणाजी माणकोजी नाईक दंडवत विनंति. आज्ञेप्रमाणे रात्रंदिवस सरकार कामावर सेवक देवडीवर हजर असतो. जे खबर रुहकार होईल ते वरचेवर खिजमतीस जाहीर केली जाईल. हे विनति ॥ श्री ॥ ३० सप्टेंबर १७५७. पे॥ छ १५ मोहरम शुक्रवार दीडप्रहररात्र उर्वरित. श्रीमंत सद्गुणमूर्ति राजश्री रावसाहेबाचे सेवेसी:आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक दि॥ नारायणराव आपाजी वकील सा॥