पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विनंति विनंतिपत्र पाठविले आहे ते पावलेंच असेल. प्रातःकालीं नवाबांनी कुच करून शहरानजीक आले. तिकडून नवाब बसालतजंगासमागमें दरगाकुलीखान व हैदरयारखान खोजे रहमतुलाखान वगैरे मोठेसे थाटाने आले. परस्परें तोफखान्याची कोटबंदी करून उभे राहिले. जसवंताचे तळ्यापाशी परस्परें भेटी जाल्या. बसालतजंग यांणी अकरा मोहरा नवाब निजामुदौला यास नजर करून अदाबाब जाऊन आणून आणखी लोकांनी नजरा करून उभयतां नवाब आपलाले हत्तीवर स्वार जाले. समागमेंच सलाबतजंग याचे डेरियास काले चबुतरियापाशी आले. नवाब सलाबतजंग दिवाणखानियाचे डेरियांत मसनदेवरच होते. त्यास निजामुदौला यांनी सलामगाबापासून अदाबाब जाऊन आणून पुढे मसनदेपाशी जाऊन नजर अकरा मोहरा व कांहीं रुपये करून नवाब उभे राहून भेटले आणि आपणापाशी बसविले. बसालतजंग आपले काईद्याने बसले. निजामुदौलायाकडील वाजदअल्लीखान व सैदकाबीलखान व बक्षी वगैरे यांणी नवाब सलाबतजंग यास नजरा करून काईद्याप्रमाणे उभे राहिले. घटका येक नालियावर त्रिवर्ग नवाब व वाजदअल्लीखान ऐसे खलवतेत दोन घटका बसोन रुसखत होऊन आपले डेरियास लष्करांत आले. सेवेसी विदित व्हावें बद्दल विनंति लि॥ असे. याउपर होईल वृत्त तें दिनचर्येचे लिहिले जाईल. विदित होय. हे विनंति. ॥ श्री ॥ ३० सप्टेंबर १७५७. पे॥ छ १५ मोहरम शुक्रवार दोन प्रहर दिवस. सेवसी विनंति. निजामुद्दौला नवाब सलाबतजंग याचे डेरियांतून उठोन बसालतजंग याचे डेरियास आले. तेथें घटका बसले. त्यांनी येक हस्ती व दोन घोडी नजर केली ते घेऊन आपले डेरियास आले. नवाब सलाबतजंग यांणी या भेटीस वस्त्रपात्र कांहीं दिल्हें नाही. हे विनंति.