पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाहेर निघते, यांचा व निजामअल्लीचा संकेत आहे की तुह्मी आलेत ह्मणजे येथून कुच करावं. त्याजपाशी अद्याप फौज मिळाली नाही. सावध नाहीत तों आपण जाऊन गाठ घालावी. उभयतां मिळोन फौज पंधरा हजार शिवाय गाडी तोफखाना आहे. ऐशीयास तुझी बहुत सावध असणे. यांचा पक्का विचार जाला आहे. सूचनार्थ लिहिले असे. परिच्छिन्न दग्याचा विचार आहे. कळले पाहिजे. तुह्मांस भरोसा देत असतील त्यावर न राहाणे. सावध असणे. आझांस आढळांत गोष्ट आली ते लिहिली असे. आह्मी लिहिलें असें कोण्हास कळों न देणे. [९०] ॥ श्री॥ २७ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १२ मोहरम, मंगळवार प्रातःकाळ, सूर्योदयसमयीं. अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षे॥ त॥ छ ११ मोहरम सोमवार अडीच प्रहर रात्र मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. दोन आज्ञापत्रे-येक जाणारडाक, दुसरे चार शुतर स्वार-सादर जाहाली ते आजच दिढा प्रहरा रात्रीस पावली. आज्ञा की दोनसें रोखें गेलियास निजामअल्लीचा रोख सुटतो व मागे पडतें, यास्तव कसनेरच्या डोंगराकडे गेलिया उत्तम, ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसियास कसनेरचा डोंगर उत्तम असे. दोन कुचें करून कसनेरच्या डोंगराकडे मुतवजे यावें. चारा डोंगरास फार आहे. जिरायताविशीं ताकीद जाहाली पाहिजे. उदईक छ १२ मोहरमी मंगळवारी हकीममहमदअल्लीखान यास घेऊन सेवेसी येतो. आज आतांच हकीममहमदअल्लीखानास नवाब बसालतजंग यापासून रुखसत करून घरास आणिलें. उदईक मंगळवारी बारा घटकानंतर भद्रा सरल्यावर सेवक सहितखानम॥रनिले येथून स्वार होतो. आतां विलंब नाहीं. निजामअल्लीहि चालला. येतो. परंतु काही चिंता नाही. यासी कुरान वगैरे अहद पैमान करून येतो. एक दोन दिवस राहून मागती फिरोन