पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाईल असा करार करितो. व हे झणजे बसालतजंग मुस्तेदहि आहेत. व उदईक मंगळवारी विसा घटकानंतर बाहेर डेरेदाखल होतील. स्वामींनी मंगळवारी कुच करून कसनेरच्या रोखें पुढें पूर्वेस यावे, ह्मणजे बसालतजंगास आसरा व निजामअल्लीवर दबाव. हकीमजीस घेऊन सेवेस येतो. जवळ सर्व कामें उगवून घ्यावी. सेवकास यावयास विलंब लागल्याबद्दल वसवासहि फार जाले. परंतु मी काही रिकामा सुखवस्त बसून राहिला नाही. सरकार कामास्तव राहिलो. मी खबर कैसी लिहितों यांत कांहीं संशय यास्तव महाराव जानोजी जसवंत निंबाळकर व माधवराव मोरेश्वर यांजकडे खासे खिजमतगार पत्रे सहित वेगळी खबर काय असेल ती कळवून सादर जाहाली ते लिहितील. सेवक उदईक येथून हकीमजीस घेऊन स्वार होतो. सर्व मजकूर रुबरुच अर्ज करीन. महाराव जानोजी जसवंत फार निखालस व सरकारचे मर्जीप्रे।। वर्तावें. वर्ततात यांत संशय नाही. व मजसीहि मैत्रिकी या दिवसांत फार जाहाली. व जसवंतरावहि सरकारचे मर्जीप्रे॥ आहेत. येथे चिरंजीव अवधुतराव यास ठेविलें. खोजेरहिमदुलाखा बहादर व नवाबसाहेब व नवाब बसालतजंग यांसीं मुकाबला घालून ठेविला. याउपरि पत्र सादर होईल तरी चिरंजीव अवधुतराव केशव याचे नांवें जाहाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. ९१] छ १२ मोहरम ॥ श्री॥ २७ सपटंबर १७५७. राजश्री विश्वासरावजी गोसावी यांसि । (Cश्रीमंतसकलउत्तमगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतचारुस्वभाव व स्ते॥ महाराव जसवंत निंबाळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १२ मोहरम जाणोन निजानंद लिहिणे. विशेष. कृपा करून पेंडापुरच्या मुकामीचे पत्र पाठविलें तें पावोन समाधान जालें. आपण समीप आलों