पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येथील वर्तमान सविस्तर अंबडापुरीहून कुच जालियावर सेवेसी लिहिले आहे. प्रणीतातीरीं सा मुकाम करून शहरास पत्रे प॥ होती व येक ग्रहस्थहि बसालतजंग याकडे पाठविला आहे. शहरची उत्तरें आली. र॥ लक्षुमणराव खंडागळे पांच सातशें स्वारानसीं त्याच मुकामी येऊन मुलाजमत केली. दुसरे रोजी कुच करून आठ कोस वरुड प॥ मार येथें मुस आले. उतरते डेरां आपण दरबारास गेलों तो नवाब जनान्यांत होते. सैद वाजदअल्लीखा भेटले. यांसी मजकूर केला की श्रीमंताकडील फौजा शहराचेच नजीक येऊन पोहचल्या. नवाब जलदी करून शहरास जातात. यामुळे नाहक उपाधीस कारण. त्यास ह्मणों लागले की नवाब सलाबतजंग बसालततजंग याचा दारमदार होणार तो जाहला. शहानवाजखान याचाहि कजिया फैसल होऊन किल्यास नवाबाकडील माहासरा होता तो उठला. श्रीमंतांकडील लोकांनी किलयावर अनुकाहि चढविला. आतां कांहीं खलष राहिला आहे ऐसें नाही. आह्मी येथवर आलो. त्यास याउपर खावंदापावेतों येकवेळ खमखा जाऊन परतोन येऊन खावंदापासी आपला आहवाल जाहीर करणे व श्रीमंताचे कृपेची वरकी करून घेणे या दो कार्यास्तव नवाब जातात. छ मजकुरी दाभाडी परगण्यांत येथून बारा कोसांवर मु॥स जाणार. तेथून कडसांगवी; तेथून शहरास दाखल व्हावयाचा निश्चय जाहला असे. विदित होय. हे विज्ञप्ति. [८९] ॥ श्री॥ २७ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १२ मोहरम मंगळवार मध्यानरात्र. उपरि निजामअल्ली आज दोन गांवावर आले. शहरीहून आठी कोसांवर छ १४ मोहरमी शहरांत दाखल होणार. बसालतजंग आजच सलाबतजंगास घेऊन बाहीर काळेचुत्र्यावर येऊन डेरे दाखल जाहले. फौजाहि