पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६५ यास्तव भेट घेऊन मागती जाईन ऐसें कुराण पाठविले. परंतु चित्तांत निजामअल्लीच्या खाटाई आहे तर हेहि सिद्ध आहेत. लढाई मातबर होईल. निजामअल्लीस मारून घेतील. निजामअल्ली येथे येऊन उभयतां बंधू येक होऊन स्वामीपाशी फिरोन गोष्टी सांगतील. ऐसें जालें तरी ज्या हातें पत्रे सेवकाने लिहिली तो हात आपल्या हातें तोडून टाकीन व मी आपली जिव्हाहि छेदून टाकीन. उभयतां भावांचा पेच पाडलाच आहे. सर्व जो मजकूर पूर्वी लिहिला त्यांत येक तिळभर अंतर पडलें तर हात तोडून टाकीन. असो. फार काय विनंति ? हुजूर यावयास आज निघालों. हकीमजीहि बारा घटकानंतर बाहेर सातान्यापासीं डेरे दाखल जाले. येथे प्रकाराप्रकारचे पेच पाडले. निजामअल्ली सुद्धां गरीबीनें यास भेटोन गेला तर उत्तम. न गेला तरी लडाई होईल. नवाब सलाबतजंग व बसालतजंग आज बाहेर निघाले. सिद्ध जाले. स्वामीहि जवळच आहे. जे जेळेस नवाब सलाबतजंग ईशारा करतील तेव्हां कुमक करावी लागेल. सर्व अर्थ उदईक रूबरू अर्ज करीन. हकीमम॥अल्लीखा यांणी पत्र लिहिलें तें अक्षरशा वाचून पाहावे व वाजदअल्लीखा दिवाण निजामअल्लीचा फार मुसाहेन, तेथे सर्व अधिकारी, मातबर विश्वासूक. वाजदअल्लीखा यांणी सेवकास पत्र लिहिलें तें बजिनस हुजूर पाठविल. पाहावे. सर्व पत्र हुजूर पुण्यास रवाना करावयास स्वामी समर्थ. सेवेसी श्रुत होय. हे विनंति. [ ८८] ॥ श्री॥ २७ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १२ मोहरम मंगळवार संध्याकाळ. श्रीमंतराजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी:विनंति सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति ऐसीजे. येथील कुशल त॥ छ ११ मोहरम दरलष्कर नवाब निजामुदौला सांगवी प॥ जाफराबाद येथून कुच होता स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. यानंतर