पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रुपये मागतात. हाहि बखेडा आहे. दिवाण विठोजीपंत बाळापुराहून अद्यापि आले नाही. त्याची मार्गप्रतीक्षा करितात. फौज स्वार मोगल सात आठ हजार आहेत व छ ५ मोहरमी जानराव आटोळा पहिलेपासून भोसलेयाचा चाकर आहे. तो चारशें रावतांनसी दाखल जाला व त्याच दिवसीं त्याकडील किरकोळ पथके निजामअल्लीपाशीं सात आठेकशें राऊत आले. याच वाटेने खंडागळा जमा होत होत हजारेक रावतानशी जाऊन दाखल जाला. याउपरी मागती शहरास येणार ही बातमी दाट आहे. बातमीवर माणसें पाठविली आहेत. जैसें वर्तमान येत जाईल तैसें लिहून पाठवीत जाईन. चरण पहावयाचा बेत सेवकाचा फार आहे. परंतु निजामअल्ली शहरास जाई तोवर गडबड फार आहे. यासाठी आजपावेतों मार्ग पाहिला. सुबत्ता पाहून येईन. निजामअल्ली या प्रायाची, सात परगणे मोगलाईचे जागिरीचे जुजबी वस्ती राहिली आहे, तेथें खंडणिया येतात ऐसें वर्तमान आहे. सेवेसी श्रुत होय. शहरीचं वर्तमान सलाबतजंग कांहीं विदेहीसे जाले आहेत. बसालतजंग कारभार करितात. ते बाहेर निघून जाऊ पाहतात. त्याची रखवाली बसालतजंग करितात. ऐसें वर्तमान ऐकिलें. लिहिले आहे. बहुत काय लिहूं. हे विज्ञापना. [८७] ॥श्री॥ २७ सप्टेंबर १७५७. पै॥ छ १२ मोहरम मंगळवार दोन घटका रात्र आवशीची. अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम त॥ छ १२ मोहरम मंगळवार मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. आज्ञापत्र सादर जालें त्यांत आज्ञा तुह्मी लिहिता कांहींच आणि सांप्रत शामजी गोविंद व गणेश संभाजी यांणी लिहिले काही वेगळे. निजामअल्ली येतो. काय मसलत आहे ? साफ लिहिणे. ऐसियास निजामअल्ली क्रियेप्रमाण भेटीसाठी मात्र येतो. मधून फिरोन गेल्याने वराडांतील अमल उठेल,