पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निघाले; ह्मणजे सरासरी सहा माहन ते पुण्यास होते. असे असून सबंध वर्षभर ते पुण्यास वस्थ बसून होते ह्मणून डफ् आपल्या इतिहासाच्या १९ व्या भागाच्या प्रारंभी लिहितो तें त्याला हा मधील डावपेंच माहीत नव्हता ह्मणून त्याने लिहिले हे उघड आहे. १७५६ च्या जानेवारीत बाळाजी सावनुरास जाऊन पोहोंचला व सावनूरच्या वेढ्यास सुरवात झाली. सावनूरची स्वारी १७५६ च्या जानेवारीपासून जूनपर्यंत चालली होती. मध्येच रघुनाथराव दादा सावनुरास येऊन मिळाले व तेथून त्यांनी कितूरास (१३) स्वारी केली. ही स्वारी jटडफ्ला माहीत नव्हती. सावनूरची स्वारी चालू असतां गोपाळराव पटवर्धनाने सोंध्यास (१४) स्वारी केली (ऐतिहासिकलेखसंग्रह २,३). हीहि स्वारी ग्रांट्डफ्ला माहीत नव्हती. गोपाळराव सोंध्याहून निघून बंकापुराजवळ हनगळ येथे उतरला व सबंद पावसाळा तेथेंच काढून पुढे उघाड झाल्यावर त्याने श्रीरंगपट्टणाकडे मोर्चा वळविला, तो १७५७ फेब्रुवारी आला.१७५७ च्या मार्गात गोपाळराव श्रीरंगपट्टणापासून दहाबारा कोसांवर होता ( लेखांक ५७,६२). १७५७ तील श्रीरंगपट्टणच्या (१५) स्वारीचे सर्व श्रेय गोपाळराचास देणें रास्त आहे.परंतु, गोपाळरावाचे नांव सुद्धा गॅट्डफ्ला माहीत नव्हते. मग त्याने ह्या स्वारीत बहुत मेहनत घेतली हे त्याला कोठून ठाऊक असणार? गोपाळरावाच्या श्रीरंगपट्टणावरील १७५९ च्या (१६) स्वारीसंबंधी देखील ग्रँटडफ्नै असेंच मौनव्रत धारण केलें आहे. हे इतके वाळाजीवाजीरावाच्या स्वा-यांसंबंधीं झालें. ह्याखेरीज कोळवणांतील कोळ्यांची बंडे वगैरेसंबंधी त्याच्या ग्रंथांत माहिती नाही हे मुद्दाम सांगितले पाहिजे असे नाही. अँडफनें अजीबात सोडून दिलेल्या मोहिमांचा येथवर विचार झाला. आतां ज्या मोहिमांची उल्लेख व वर्णने त्याने केली आहेत त्यासंबंधी माझें ह्मणणे काय आहे ते सांगतों. १७५० पासून १७६१ पर्यंत ज्या मोहिमांची माहिती पँट्डफ्नै दिली आहे त्या सर्वांत पानिपतच्या मोहिमेचे वर्णन त्याच्या त्या वेळच्या माहितीप्रमाणे त्याने बरेंच विस्तृत दिले आहे. त्याच्याहिपेक्षां कीनने पानिपतचे वर्णन बरेंच सांगोपांग दिले आहे. परंतु, ह्या दोन्ही ग्रंथकारांनी काशीराजावरती सर्वस्वी भिस्त ठेवल्यामुळे त्यांची वर्णनें एकदेशीय व अपुर्ती झाली आहेत. तों अपूर्ती व एकदेशीय कशी झाली आहेत ह्याचे विवेचन मी पुढे केले आहे. तेव्हां सध्या ह्या मोहिमेला सोडून दुसऱ्या मोहिमांकडे वळतो. उदगीरच्या मोहि- . मेचे व युद्धाचे वर्णन डफ्नै त्याच्या नित्याच्या नेमाप्रमाणे त्रोटक परंतु बरें केलें आहे. पानिपतच्या लढाई खेरीजकरून १७५० पासून १७६१पर्यंत झालेल्या बाकी कोणत्याहि लढाईची तारीख देण्याच्या भानगडीत पँट्डफ् पडला नाही; त्याप्रमाणे ह्याहि लढाईची तारीख त्याने दिली नाही. ग्रांटडफ्च्या वर्णनाशी मी छापिलेली पत्रे ताडून पाहिली असतां वाचकानां कांहीं तफावत व बरीच नवीन माहिती दिसून येईल. शिंदखेडच्या मोहिमेसंबंधी ह्या ग्रंथांत सरासरी ७० पत्रे छापिली आहेत. त्यांत लढाई होण्याच्या अगोदर झालेल्या कारस्थानाची वारीक हकीकत आहे. त्या हकीकतीशी ग्रांटडफ्ची हकीकत ताडून पाहिली असतां कांही तफावत व बराच नवीन माहिती दिसून येईल. अँडफ्नै ह्या मोहिमेची